धरणगाव

वराड खुर्द येथील तरूण शेतकरीची सतत ची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या

वराड खुर्द येथील तरूण शेतकरीची सतत ची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या.

वराड ता धरणगांव वार्ताहर संजय पवार

येथील तरूण शेतकरी दोन ते तिन वर्षा पासून ची सतत माल आला तर भाव नाही ,कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ अशा संकटातून वाटचाल करणारा व पुर्ण निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी ने अखेर विहिरीत उडी मारून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. आनंदा श्यामराव पाटील वय38असे या तरूण शेतकरी चे नाव असुन त्यांनी मी शेताकडे जाऊन येतो असे आपल्या आईला सांगुन गेला.लवकर घरी न आल्यामुळे त्यांनी कालपासून शोधाशोध केली संशयावरून त्यांच्याच घरच्या शेताच्या विहिरी मध्ये पाणी भरपुर असल्याने आज विहिरी चे पाणी उपसून त्यांचे शव तरूणांनी मोठ्या कसोशीने प्रेत बाहेर काढले वराड गाव एकदम सुन्न झाले
सततच्या नापिकी मुळे डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर कसा उतरेल या वर्षी चांगला पाऊस झाल्याने त्याला एक ऊमेद वाटत होती परंतु परतीचा पाऊस झाल्याने त्याची हाताशी आलेली 100ते125पोती ज्वारीचे नुकसान तसेच कापूस ही हाताचा गेलेला पाहुन तो पुर्णपणे खचला. व आता कर्ज कसे फेडणार मुलगी लग्नाची असल्याने लग्न कसे होईल या विवंचेत त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा पश्र्चात आई,वडील, पत्नी,भाऊ,तिन मुली एक मुलगा असा परिवार आहे त्याची अंत्ययात्रा 3रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. फिर्याद राजु पाटील यांनी पाळधी पोलिस ठाण्यात दिली पुढील तपास पो. अमोल पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Back to top button