Nashik

निष्ठावंताना डावलल्यामुळे दिंडोरी लोकसभेत युवासैनिक नाराज..

निष्ठावंताना डावलल्यामुळे दिंडोरी लोकसभेत युवासैनिक नाराज..

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी शिवसेनेने युवकांना न्याय मिळावा म्हणून युवासेनेच्या माध्यमातून कार्य केले, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना विस्तारक निलेश गवळी यांनी दिंडोरी लोकसभेच्या नियुक्त्या केल्या, मात्र निष्ठावंताना डावलल्यामुळे युवासैनिक नाराज झाल्याचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सूर निघू लागला आहे,
नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्तीने दिंडोरी लोकसभेत युवासेनेत नाराजी दिसून आली, कोणत्याही प्रकारची मुलाखती न घेता व युवासेना आणि शिवसेना यांच्या कोणत्याही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता या निवडीमुळे हा असंतोष उफाळून आला. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटील ह्यांच्या मध्यस्तिने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी ह्यांच्या उपस्थितीत बैठक घेवुन दोन दिवसात तोडगा काढु असा शब्द देवुन नाराज युवा सैनिकांची समजुत काढली, यावेळी सहसंपर्क प्रमुख पांडुरंग गणोरे, संगम देशमुख, आदित्य केळकर, संजय ढगे, संदीप जाधव, राहुल गणोरे, श्याम वाघमारे, कैलास गणोरे, आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button