Rawer

निंभोरा येथे युवा मावळ्यांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी

निंभोरा येथे युवा मावळ्यांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी

संदिप कोळी
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे रेणुकामातेच्या साक्षीने युवा रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन शिवजयंती साजरी केली ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी मावळ्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान दिले व स्वराज्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे आजच्या युवकांनी शिवाजी राजांचे मावळे बनून रक्तदान केले व शिवजयंती साजरी केली सदरचा कार्यक्रम रेणुका मातेच्या मंदिरात आयोजक योगेश सोनवणे व पोलीस मित्र परमानंद शेलोडे अतुल गोराडकर अक्षय दोडके हिमांशू चौधरी आयुष काटोले यश पवार निलेश बऱ्हाटे या युवकानी घडवून आणला या कार्यक्रमाला सुरूवातीला गावातील मान्यवरांच्या हातून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच मान्यवरांनी रक्तदात्यांचे व आयोजक युवा मावळ्यांचे भेट देऊन मनापासून कौतुक करून खूप खूप अभिनंदन केले व पत्रकार बंधूंनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सत्तर रक्तदात्यांनी आपले शिवाजी राजांच्या मावळे यांच्या रूपाने रक्तदान दिले रक्त घेण्याकरिता रेड प्लस ब्लड बँक व त्यांची सर्व टीम उपस्थित होती त्यांच्या टीम मधील डॉक्टर सलमान पटेल डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी डॉक्टर मिलिंद नांदेल मॅडम ईशा सूर्यवंशी सर गितेश परदेशी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली रक्तदात्यांचे आयोजकांनी मनापासून खूप खूप आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button