Jalgaon

पुढील ५० वर्षाचे भवितव्य घडविण्यासाठी शिवधनुष्य हाती घेऊन शिवसेनेला भक्कम साथ द्या -शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील

पुढील ५० वर्षाचे भवितव्य घडविण्यासाठी
शिवधनुष्य हाती घेऊन शिवसेनेला भक्कम साथ द्या -शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील

नितीन माळे

जळगाव – सर्वांशी बंधुत्व हेच शिवसेनेचे हिंदुत्व असुन विधानसभेची होऊ घातलेली निवडणुक ही पुढील ५० वर्षाचे भवितव्य घडविणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राला धनुष्यबाणा शिवाय पर्याय नसुन शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र या आणि सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र, शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र, पायाभुत सुविधा असलेला महाराष्ट्र, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा प्रसिध्द व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. वास्तव्याची जाण, परिस्थितीचे भान व प्रशासनाचे ज्ञान असलेले व्यक्तीमत्व म्हणजे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आहेत. विकासासोबतच तर महाराष्ट्राच्या हितासाठी गुलाबराव पाटील यांना राज्यात सर्वांधीक मतांनी विजयी करुन पुन्हा विधानसभेत पाठवा, असे जोरदार आवाहन देखील बानगुडे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टिकास्त्र सोडले.”मी महाराष्ट्र , निश्चय मेळाव्या” प्रसंगी म्हासावद येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

*अब की बार 50 हजार लीड पार !* – गुलाबराव पाटील

यावेळी जाती पातीच्या राजकाणापेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले.मतदार संघातील उर्वरित कोरडवाहुभाग सिंचनाखाली येइपर्यंत स्वस्थ बसणार नाही.मागील निवडणुकीत 33 हजाराचे लीड दिला होता यावेळेस अब की बार 50 हजार पार करून माझी सालदारकी वाढवून दयावी असे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांनी हात वर करून मतदान करणारच असा निर्धार केला.

शिवसेना भाजपा रिपाई रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ म्हासावद येथे निश्चय मेळाव्याचे आयोजन महायुती मार्फत करण्यात आले होते. यावेळी रासपचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सौ.शितल चिंचोरे ,रिपाइंचे अनिल अडकमोल,शिवसेनेचे संजय घुगे,संजय पाटील,रावसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे रावसाहेब पाटील, राजेंद्र चव्हाण,नाना सोनावणे, भाजपचे महेंद्र चव्हाण व नाना पाटील,रिपाई चे अनिल अडकमोल, जि प सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी,सरपंच मीना चिंचोरे, रासपचे शितल चिंचोरे,प स सदस्य,नंदलाल पाटील, संगीता समाधान चिंचोरे,चावदास कोळी,रमाताई धिवरे, धोंडू जगताप,विमल चिंचोरे,सर्व सरपंच पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

*म्हासावद परिसरातील पदाधिकाऱ्यांचा सेनेत प्रवेश !*
जळगाव तालुक्यातीलम्हासावाद येथिल माजी सरपंच विनायकुमार कटारिया ,लमांजन येथिल विनोद पाटील, समाधान कोळी,बाजीराव मराठे,रामदास पाटील,धोबी वराड येथिल सलीम शहा,गौतम दांडगे,जहुरशाह, सागर जाधव,आशिफाशह,तर वावडदा येथिल एस.के.युवमंचाचे आनंदा राजपूत,संतोष कापडणे, धनराज पाटील,विशाल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत शिवसेना उपनेते नितीन बांडगुडे पाटील यांनी केले.

सभेचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन भाजपाचे मा.तालुकाध्यक्ष कैलास चव्हाण सर यांनी केले.तर आभार विजय आमले यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button