Nashik

योगामुळे मन व शरीर सुदृढ होण्यास मदत होते- प्राचार्य आर सी वडजे

योगामुळे मन व शरीर सुदृढ होण्यास मदत होते- प्राचार्य आर सी वडजे

सुनिल घुमरे नाशिक विभागीयप्रतिनिधी

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम व योगाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयात सूर्यनमस्कार उपक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी वडजे बोलत होते.
प्राचार्य आर सी वडजे यांनी पुढे बोलतांना सांगितले योगामुळे आपले मन व शरीर सुदृढ होऊन आपली चिंतन क्षमता वाढते मनोबल वाढते व बौद्धिक विकास होतो त्याचबरोबर सुंदर आरोग्य लाभते. विद्यार्थ्यांना आरोग्य साठी सर्वांगसुंदर व्यायाम हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.सूर्यनमस्कार केल्यास नक्कीच आपला शारीरिक मानसिक विकास होतो.
विद्यालयात सकाळी सूर्यनमस्कार उपक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजेउपप्राचार्य यु डी भरसट पर्यवेक्षक श्रीम एन पी बागुल,डॉ जी व्ही अंभोरे ,आर व्ही मोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील जेष्ठ शिक्षक योगगुरू बी के उफाडे क्रीडा शिक्षक पी आर गायकवाड, देवरे, मोगल, पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
फोटो- दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात योगा व सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक प्रसंगी प्राचार्य आर सी वडजे, पर्यवेक्षक, क्रीडाशिक्षक व विध्यार्थी आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button