Akola

अगस्तीने उभारलेले १00 बेडचे कोविड सेंटर आज पासून सेवेत

अगस्तीने उभारलेले १00 बेडचे कोविड सेंटर आज पासून सेवेत

विठ्ठल खाडे

अकोले : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा तालुक्यातील आकडा पाचशेच्या घरात गेल्याने अगस्ती सहकारी साखर कारखान्याने १०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे . विठ्ठल लॉन्स येथे कोविड सेंटर उभारण्यात आले असून गुरुवारपासून सुविधा देण्यास सुरुवात केली जाणार आहे . अकोलेत खानापूर येथे शासनाने कोविड सेंटर उभारले आहे . येथे सध्या ९ ४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी इंद्रजीत गंभीरे यांनी सांगितले . चार ग्रामीण रुग्णालये व १० प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना उपचारासाठी सज्ज आहेत . खानापूर व राजूर , कोतूळ , देवठाण , ब्राम्हणवाडा या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोना तपासणीची सुविधा सुरु करण्यात आली आहे . कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता अगस्ती साखर कारखान्याने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेत तातडीने अंमलबजावणी केली आहे . १०० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर थाटले आहे . जास्त प्रादुर्भाव असलेल्यांसाठी विशेष खोल्या व बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे
आज अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कविड-१९ केअर सेंटर चे उदघाटन माजी मंत्री मा. मधुकरराव पिचड साहेब , जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. सिताराम गायकर साहेब, माजी आमदार मा. वैभवराव पिचड साहेब ,मा. तहसीलदार कांबळे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button