Aurangabad

‘योग दिन’ नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

‘योग दिन’ नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात २१ जून रोजी ‘योग दिन’ कोरोनाचे नियम पाळून नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित योग दिनाच्या पूर्वतयारी बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे,निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह विविध योग संघटनांचे प्रतिनिधी, योग शिक्षक,विविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष ,प्रतिनिधी व खेळाडू उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, कोवीड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत योग दिन अधिकाधिक नागरिकांच्या सहभागातून उत्साहात साजरा करा. योग हा शारीरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीतही प्राचीन काळापासून योगाला विशेष महत्व आहे.

सध्या कोरोना संसर्गात आपली प्रतिकार शक्ती आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता मजबूत ठेवणे गरजेचे बनले आहे. त्या पार्श्वभूमीवरही सर्वांनी नियमित योगासने, योग, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने २१ जून रोजी योग दिनामध्ये सर्वांना सक्रियपणे सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबधितांना दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button