Navi Mumbai

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ने दुमदुमले सिवूड

नवी मुंबई ,प्रतिनिधी राजेश सोनुने

महाराष्ट्राचा जागता-गाजता लोकदेव खंडोबा आपल्या परंपरा लोकउत्सव जत्रा यात्राच्या व भक्ती विश्वासामधून भारतीय सांस्कृतिक प्रतीक म्हणून जगभर ख्याती प्राप्त झाला आहे.नेरुळ येथील जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सिवूड परिसरात पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

'येळकोट येळकोट जय मल्हार' ने दुमदुमले सिवूडजातीधर्म ऐक्याचा सलोखा जोपासणाऱ्या खंडोबाचे नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तगण आहेत.सिवूड व नेरुळ परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र यावे यासाठी जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सांयकाळच्या सुमारास ही पालखी सिवूड येथील खंडोबा मंदिर येथून सुरू झाली असून पुढे ती साईबाबा मंदिर ,डी ए.व्ही. शाळा या मार्गाने जाऊन विठ्ठल रखुमाई मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी सिवूड व नेरुळ मधील सर्व नागरिकांनी पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला.तसेच उपस्थित भक्तगणांसाठी कीर्तन,भजन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या पालखी सोहळ्या प्रसंगी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव ठोंबरे ,सचिव नरसिंग शिंदे ,जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मंदिराचे सदस्य अभंग शिंदे,सदस्य संतोष ठोंबरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी पालखी सोहळ्या प्रसंगी पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्याप्रसंगी अवघा सिवूड व नेरुळ परिसर येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांनी दुमदुमला होता.यावेळी उत्तम तडाखे,भिकू ठोंबरे ,वसंत जाधव ,राहुल गोपले,मुकुंद वायदंडे ,बालाजी जाधव,योगेश शिंदे,सतीश भालेराव,सागर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button