Yawal

यावल पचायत समीतीच्या प्रशासकिय इमारतीचा लोकापर्ण सोहळा वादाच्या भोवऱ्यात

यावल पचायत समीतीच्या प्रशासकिय इमारतीचा लोकापर्ण सोहळा वादाच्या भोवऱ्या

यावल ( प्रतिनिधी )येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा रविवारी २४ तारखेला होत असलेला उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातर्फे निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात आले असून त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीश महाजन हे उपस्थित राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, चोपडा मतदार संघाचे आमदार लताताई सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, अरुणा पाटील, सविता भालेराव,नंदा सपकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन उपस्थित राहतील असे निमंत्रक पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांनी कळविले आहे.

दरम्यान या कार्यक्रम पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी सदर कार्यक्रम प्रोटॉकल नुसार होत नसल्याचा आरोप करीत, आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असताना प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची घाई का करण्यात आली असा प्रश्न श्री.पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक आमदारांना संधी न देता इतर मतदार संघातील आमदारांना संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.एकूणच येत्या रविवारी होत असलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील याविषयी शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी व्ही.एन. भाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र सदरचा कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button