Amalner

युवामित्र परिवाराचा युवा सदस्य यश वर्मा ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा..!सर्वत्र कौतुक..!

युवामित्र परिवाराचा युवा सदस्य यश वर्मा ने केला सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा..!सर्वत्र कौतुक..!

अमळनेर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर युवा मित्र परिवार सतत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो.सामाजिक बांधिलकी जपत ह्या युवांच्या ऊर्जा श्रोताचा चांगला विनियोग करत समजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने दरवर्षी गोरगरीबांना अन्नदान करुन आपला वढदिवस साजरा करणारे आशिष अलंकारचे मालक यश वर्मा यांनी आज आपल्या युवा मित्रांसोबत पिंपळे येथील आदिवासी आश्रम शाळेत ३०० विद्यार्थ्यांना आन्नदान करुन माणूसकीचे दर्शन घडविले.हल्ली युवकांमध्ये चंगळवाद निर्माण झाला आहे.युवा पिढी डीजे ,बॕनर हल्ला गुल्ला ह्याकडे अधिक आकर्षित होते.पण असा अपव्यय खर्च न करता गोरगरीब गरजुं ना केलेल्या अन्न दानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी सामाजीक कार्यकर्ते मनोज शिंगाणे,दिनेश तेवर, मनोज माळी,दीपक प्रजापती, शुभम पाटील,मोहन पाकळे, सुनील भोई व आदिवासी आश्रम शाळेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रक्तदानाच्या माध्यमातून या युवा मित्र परिवाराने आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे सदैव समाज उपयोगी उपक्रम या युवांच्या माध्यमातून राबविले जातात म्हणून सगळ्याच स्थरातून या गृपला कौतुकाची दाद मिळत असते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button