Nashik

“यश डिजीटल मिडीया “ही नाशिककरांसाठी एक पर्वणी- श्रीम.निलिमाताई पवार

“यश डिजीटल मिडीया “ही नाशिककरांसाठी एक पर्वणी- श्रीम.निलिमाताई पवार

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : यश डिजिटल मीडिया ही नाशिक करांसाठी मोठी संधी व पर्वणी असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीम निलिमाताई पवार यांनी केले.
नाशिक मधील गोविंदनागर येथील ऑनलाईन डिजीटल मार्केटिंग एजन्सीचे उदघाटन श्रीमती निलीमाताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या प्रसंगी निलीमाताई बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की या पोष्ट कोविड जगात सर्व गोष्टी ऑनलाईन होणार असून यश डिजीटल मिडीया ही नाशिकरांसाठी एक चांगली संधी आहे. या मार्फत बेबसाईट डेव्हलपमेंट, डिजीटल मार्केटींग,
क्रिएटीव्ह डिझायनींग, ई कॉमर्स, सोशल मिडीया, ब्रॅन्डींग या सुविधा मिळणार आहेत.
युवर अॕडव्हटाईंजीग सोल्युशन हब म्हणून सदर कंपनी काम करणार आहे.
yashdigitalmedia.com या वेबसाईटचे अनावरण जिल्हा परिषद सदस्या इंजि. सिमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी केले. त्यांनी नवीन जगात डिजीटल मिडीयाचे महत्व विशद केले.
या प्रसंगी एच. एस. सी बोर्डाचे अध्यक्ष कृष्ठाकांत पाटील,
शंकर राव हांडगे, जोस्ना पवार, डॉ डी एम पावर, व अनेक उदयोजक, डॉक्टर, मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय पवार यांनी व आभार संदीप हांडगे यांनी मानले.
फोटो- यश डिजीटल मिडीया “एजन्सी चे उदघाटन करतांना मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीम निलिमाताई पवार आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button