यावल

चुकीचे कामे, अवैध धंदे करणार्‍या मागे लागले सूर्यग्रहण.

चुकीचे कामे, अवैध धंदे करणार्‍या मागे लागले सूर्यग्रहण.

प्रभारी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांची बेधडक कार्यवाही.

गावठी हाथभट्टी दारूचा अड्डा केला उध्वस्त.

सुरेश पाटील

यावल दिनांक 29 ता.प्र. गेल्या दोन दिवसापूर्वी कंकणाकृती सूर्यग्रहण लागले होते, या ग्रहणाच्या कालावधीत पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला, प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून अरुण धनवडे यांनी काल दिनांक 28 रोजी यावल पोलीस स्टेशनचा प्रभारी कार्यभार हाती घेतला पहिल्याच दिवशी त्यांनी समयसूचकता बाळ गुन शहरातील दोन महत्त्वाची प्रकरणे मोठ्या शिताफीने हाताळल्याने चुकीची कामे, अवैध धंदे करणार्‍या मागे आता कायद्याचे सूर्यग्रहण सुरू झाले असल्याचे यावल पोलिस स्टेशन हद्दीत बोलले जात आहे.
गेल्या वर्षभरात यावल पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे हजर झाले आहेत, त्यांच्या मवाळ आणि शांत स्वभावामुळे किरकोळ स्वरूपाचे वाद आणि भांडण तंटे, अवैध धंदे करणाऱ्यांचे मोठे मनोबल वाढले होते आणि आहे, परंतु पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी आपल्या खाजगी कामानिमित्त रजेवर जाण्याचा अर्ज दिल्याने पोलीस अधीक्षक जळगाव यांनी तातडीने पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे यावल पोलीस स्टेशन चा कार्यभार सोपविला. काल दिनांक 28 रोजी हजर झाल्यानंतर धनवडे साहेबांनी दोन महत्त्वाच्या प्रकरणात स्वतः घटनास्थळी हजर होऊन संपूर्ण यावल शहराच्या हिताचा निर्णय घेतला, तसेच दिवसभर त्यांनी ठिक ठिकाणी भेटी देऊन तसेच प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक, शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून महत्त्वाच्या सूचना देऊन काही चुकीची कामे केल्यास, अफवा पसरविल्यास, छेडखानी केल्यास कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या. काल दिनांक 28 रोजी संध्याकाळी भुसावल रोडवर एका खाजगी चायनीज सेंटरवर दोन जणांमध्ये तुफान हाणामारी झाली असता मारामाऱ्या करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
त्याचप्रमाणे आज दिनांक 29 रविवार रोजी सकाळी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलिस पथकासह अंजाळे शिवारात तापी नदीच्या काठावर सुरू असलेल्या हात भट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून 6 ब्यारल भरलेले कच्चे-पक्के रसायन 1100 लिटर, तयार दारू 40 लिटर, मिळून आली असता दारूचा नमुना घेऊन ते सर्व साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले घटनास्थळावर पोलीस जाताच दोन आरोपी फरार होऊन गेले आरोपीचा शोध घेणे सुरू आहे यामुळे यावल पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये, तसेच चुकीची कामे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून यावल पोलीस स्टेशन हद्दीत कायदा-सुव्यवस्था जातीय सलोखा कायम राहणे कामी तसेच अवैध धंदे करणाऱ्यांवर नियंत्रण राहणे कामी जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव डीवायएसपी फैजपूर भाग यांनी यावल पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक म्हणून अरुण धनवडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button