Yawal

विरावली गावात 15 वित्त आयोग आमचा गाव आमचा विकास कृती आराखडा 2021 – 22 साठी केली लेखी सुचना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा ग्रा प सद्स्य अॅड. देवकांत पाटील यांची मागणी

विरावली गावात 15 वित्त आयोग आमचा गाव आमचा विकास कृती आराखडा 2021 – 22 साठी केली लेखी सुचना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा ग्रा प सद्स्य अॅड. देवकांत पाटील यांची मागणी

यावल ( शब्बीर खान ) विरावली ता यावल येथे नुकत्याच झालेल्या मासीक सभेत दिनांक 27/12/2021 रोजी राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष तथा ग्रा प सद्स्य अॅड. देवकांत पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी 15 वा वित्त आयोग कृती आराखडा साठी आमचा गाव आमचा विकास यासाठी ग्रामसेवक यांना निवेदन दिले त्यामध्ये 15 वित्त आयोगाचे सन 2022- 23 या वर्षात कृती आराखड्यात येणाऱ्या आर्थिक वर्षात कोणकोणती कामे झाली पाहिजेत त्यात स्वच्छता व आरोग्य पाणीपुरवठा मूलभूत सुविधा शैक्षणिक सोयी सुविधा या विरावली गावात आगामी येणाऱ्या आर्थिक वर्षात 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष तथा ग्रा प सद्स्य विरावली अॅड.देवकांत पाटील सौ शोभा पाटील शकुंतला पाटील व हमीदा तडवी या सदस्यांनी लेखी स्वरूपात सरपंच विरावली व सचिव यांना अर्ज करून सूचना करण्यात आल्या .

15 व्या वित्त आयोगाचे सन 2022/2023 कृती आराखडा (आमचं गाव आमचा विकास) महत्वाच्या सुचना खालीलप्रमाणे.
 स्वच्छता व आरोग्य
1) स्वच्छतेच्या दृष्टीने घंटा गाडी व्यवस्था करावी(तीनचाकी सायकल/बॅटरी वरील वाहन)
2) गावातील चौकाचौकात कचराकुंडीची व्यवस्था करणे.
3) गावात सार्वजनिक ठिकाणी मुतारीचे बांधकाम करणे.
4) स्वच्छतेच्या दृष्टीने सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे.
5) आरोग्य निरोगी राहण्यासाठी गावात नियमित निर्जतुकी करण्यासाठी फवारणी यंत्र (फेंगिंग मशीन) घेणे बाबत .
 पाणी पुरवठा :-
1) पाणी पुरवठा योजनेसाठी स्टँड बाय मोटरची व्यवस्था करणे.
2) पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत असलेल्या विहीर,बोरवेल यांचे पुनर्भरण करून उपाय योजना करणे.
3) गावात वाटर ए.टी.एम. बसवणे. वाटर मीटर
4) गावातील सार्वजनिक व खाजगी नळांना हॉल बसवून पाण्याविषयी तज्ञांच्या मध्यमातून महत्व सांगून जनजागृती करावी.
5) 5) सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई उभारणे.
 इतर मुलभूत सुविधा :-
1) स्मशान भुमीत कोकटीकरन करून प्लेव्हर ब्लॉक करून कंपाऊट करणे बाबत.
2) वार्ड क्र. 03 मध्ये बस स्टँड पासून खालचे नाव मारुती मंदिर पासून नजिर तडवी यांच्या घरापर्यंत कॉक्रेटीकरण करून रस्ता तयार करणे.
3) वार्ड क्र. 03 मध्ये खालचे गाव नविन प्लॉट एरिया मध्ये अंडर ग्राऊंड गटारी करून कॉक्रेटीकरण रस्ते तयार करणे.
4) गावाच्या सर्व बाजूला व दहिगाव रोड गणपती मंदिराजवळ सौर उर्जेवर चालणारे लाईट बसवणे.
5) गावातील सर्व चौकामध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवणे.
6) वार्ड क्र. 03 मध्ये नविन प्लॉट परिसरात ओपन स्पेस जागेत कंपाऊंट करून बगीचा करून शुशोभीकरण करणे.
7) वार्ड क्र. 03 मध्ये नविन नजिर तडवी/लिलाधार पाटील यांच्या घराजवळ सौर लाईट बसवणे.
8) दहिगाव रोड तडवी कबरस्थानमध्ये सौर उर्जेवर चालणारे लॅम्प,लाईट बसविणे.
9) ग्रापंचायत आवारात कंपाऊंट करून फ्लेवर ब्लॉक बसवून शुशोभीकरण करणे.
10) गावातील सार्वजनिक भिंतीवर शिक्षणिक जन जागृती करणे.

 शैक्षणिक सोई सुविधा :-
1) गावात इंटरनेट वायफाय सेवा विद्यार्थांना मोफत उपलब्ध करून देणे बाबत.
2) संपूर्ण गावासाठी व्यायाम शाळा सुरू करावी.
3) जि.प.मराठी मुलांची शाळा विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी,संगणक,स्मार्ट टिव्ही देणे. तसेच शाळेतील इमारतींच्या आत व बाहेर रंगरंगोळी करून सुविचार लिहून शैक्षणिक वातावरण निर्माण करावे.
4) प्राथमिक शाळा व अंगणवाडी मध्ये हात धुण्यासाठी हॅन्ड वाश स्टेशन तयार करणे निवेदनावर ग्रा.पं.सदस्य अॅड देवकांत बाजीराव पाटील .
शोभा युवराज पाटील शकुंतला विजयसिंग पाटील
हमीदा टेनू तडवी आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button