Amalner

Amalner: अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिवस…

अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिवस…

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील भाविकांचे श्रद्धास्थान जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात कोरानाच्या नियमाचे पालन करून जागतिक पारायण दिवस साजरा करण्यात आला.
सकाळी सहा वाजता संत गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. गजानन विजय ग्रंथाचे वाचन गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त ज्योतीताई राजेंद्र पवार यांनी केले.
यावेळी गजानन परिवारातील महिला पारायणासाठी उपस्थित होत्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जागतिक पारायण दिवस साजरा करण्यात आला .
यावेळी देशावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी गजानन महिला भक्तांनी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.
यावेळी संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष आर.बी. पवार व गजानन भक्त यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button