Rawer

ऐनपूर महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न.

ऐनपूर महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न.

संदिप कोळी रावेर

रावेर : येथून जवळच सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले. जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमोल जावळे मानसोपचार तज्ञ, व्यसनमुक्ती व सेक्स विकार तज्ञ, सूर्या हॉस्पिटल, जळगाव हे लाभले. त्यांनी व्यक्तीला आनंदी जीवन जगायचे असेल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे. बुद्धांनी सांगितलेल्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धांता नुसार या विश्वातील प्रत्येक वस्तू परिवर्तनीय आहे म्हणजेच अनित्य आहे असे सांगितले. त्याच बरोबर त्यांनी आत्महत्या, नैराश्य, ताण, चिंता, या सर्व बाबतीमध्ये उपचार म्हणून सॉफ्ट स्किल सांगितले. तसेच कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक डॉ. प्रियंका अमोल जावळे, सूर्या हॉस्पिटल, जळगाव यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी मध्ये असणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपचार यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आनंदी मय जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने शारीरिक-मानसिक बौद्धिक दृष्टीने आपले स्वास्थ्य सुदृढ असणे गरजेचे आहे.असे त्यांच्या अध्यक्षीय समारोपा मध्ये सांगितले
. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विनोद रामटेके यांनी केले व त्यांनी प्रास्ताविकामध्ये कोरोनाच्या या काळामध्ये व्यक्तीमध्ये भय, चिंताआणि ताण इत्यादी गोष्टी निर्माण झालेले आहेत त्या दूर करण्यासाठी व्यक्तीने योगा व मेडिटेशन करणे आवश्यक आहे असे त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. सदर कार्यक्रमाला ९२ विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,नागरिक पालक आणि संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले प्रश्न मांडले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संदीप साळुंके यांनी मानले.

फोटोत मार्गदर्शन करतांना डॉ. अमोल जावळे सोबत प्राचार्य डॉ. जे.बी.अजने, प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.व्ही.एन.रामटेके.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button