Amalner

Amalner: बँकेचे काम करावयास गेलेला तरुण परतलाच नाही…

Amalner: बँकेचे काम करावयास गेलेला तरुण परतलाच नाही…

अमळनेर तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी अरविंद पाटील हा बँकेचे काम करून येतो असे सांगून गेला तो परतलाच नाही. याप्रकरणी तक्रारीवरून मारवड पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी अरविंद गुलाबराव पाटील (वय 36) हा दिंडोरी (गुजरात) येथे काम करतो. दिनांक 8 ऑक्टो रोजी तो गावी तांदळी येथे घरी आला. 9 ऑक्टो रोजी सकाळी तो अमळनेर येथे बँकेचे काम करून येतो असे सांगून घरातून निघाला. संध्याकाळ झाली तरी तो परतला नाही. म्हणून त्याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद आला.
नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून न आला नाही.म्हणून गोपाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ शरीफ पठाण व हे.कॉ सचिन निकम करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button