Pune

एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन

एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस.बी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष(आईक्यूसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल इंजिनिअरिंग मधील ईस्टीमेशन,कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर्स विषया वर एक आठवड्याचा ऑनलाइन अल्पकालीन कार्यशाळा, (शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम) दिनांक 12/01/2022 ते 16/01/2022 रोजी आयोजित करण्यात आली, या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे यांनी केले व प्रा.आर. बी घोगरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख यांनी विभागाची माहिती दिली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कु.अश्विनी तळे मॅडम, सीनियर इंजिनियर (एस अँड जे बिल्डकॉन प्रा.लि.,पुणे) यांनी मार्गदर्शन केले, या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आयोजन प्रा.मंजुश्री घोगरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.एस.व्ही.बनकर यांनी केले. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या निम्मिताने संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील साहेब, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button