Nashik

विंचूर ग्रामपालिका सफाई कामगार महासंघाचे कामबंद आंदोलन …

विंचूर ग्रामपालिका सफाई कामगार महासंघाचे कामबंद आंदोलन …

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक= अत्याचार विरोधी कृती समिती संलग्नित विंचूर ग्रामपालिका कामगार महासंघाचे वतीने विचूर ग्रामपालिका कार्यालयासमोर दिनाक ११-३-२०२२ मु.पो.विंचूर, ता. निफाड, जि. नासिक येथे “असहकार कामबंद आंदोलन” करण्यात आले.
यावेळी आंदोलन कर्त्यानी कामगार एकजूटीचा विजय असो! आमच्या विविध मागण्या मान्य करा, नाहितर खुर्च्या खाली करा! अशा गगनभेदी आरोळ्यांनी परिसर दुमदुमला होता.

याअगोदर समितीच्या वतीने वेळोवेळी ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच आणि सदस्य यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध न्याय व रास्त मागण्यांचे लेखी स्वरूपाचे निवेदने दिलेली होती, भेटून चर्चा केली असतांना देखील कोणतीही मागणी मान्य न झाल्याने सफाई कामगारांनी असहकार कामबंद आंदोलनद्वारे कामगार एकजूटीचे दर्शन घडविले, विविध मागण्याचे लेखी निवेदन सादर केले.

आंदोलनाचे नेतृत्व समितीचे मुख्य निमंत्रक अॅड. राहुल तुपलोंढे यानी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी काशिनाथ गायकवाड, अनिल जगधने, दिपक शिरसाठ, भाऊसाहेब जाधव, सिध्दार्थ भोसले, विजेद्र निकाळे,संगीता गायकवाड, म॔गला शिरसाठ, अर्चना डावरे, मंगला भोसले, सविता ऊबाळे, सुनंदा जगधने, छाया जाधव, विशाल त्रिभुवन, शामाआण्णा कापसे, मंगला निकाळे, कृष्णाबाई कापसे आदि पदाधिकारी व सफाई कामगार ऊपस्थित होते.

कामबंद आंदोलनाचे दणक्याने विंचूर ग्रामपालिका प्रशासन हादरून केले, गावात कचरा व घाणीचे ढिग साचल्याने नागरिकांनी ग्रामपालिका प्रशासनाला जाब विचारत संताप व्यक्त करत, सफाई कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात म्हणून खडे बोल सुनावले,यामुळे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व आजी-माजी सदस्यांनी आंदोलकांच्या सर्वच मागण्या मान्य करून तसे लेखी स्वरूपाचे पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button