Yawal

यावल येथे महिलांची राष्ट्रवादी पक्षाची बैठक

यावल येथे महिलांची राष्ट्रवादी पक्षाची बैठक

यावल शब्बीर खान

दिनांक 22 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात दुपारी एक वाजता महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी साठी व नवीन कार्यकारणी च्या निमित्ताने आगामी काळात येऊ घातलेल्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीत संदर्भात महिलांच्या संघटनात्मक व निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के वाटा कसा आणि किती महत्त्वपूर्ण आहे यासंदर्भात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ वंदना अशोक चौधरी यांनी यावल ला महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले जिल्हा महिला अध्यक्ष सौ वंदना चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या यात राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्ष द्वारका ताई पाटील माजी जिल्हा उपाध्यक्ष उषा निळे प्रतिभा नीड नंदा महाजन नीलिमा धांडे जोशना महाजन शर्मिला जोगी हमिदा तडवी उषा पाटील सुनंदा पाटील सुलोचना धनगर प्रतिभा धनगर बेबीबाई सोळंके ललिता सोळंके यमुना सूर्यवंशी लता चौधरी समरीन शेख रहीम शेख आदी अनेक महिला कार्यक्रमात उपस्थित होत्या याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्राध्यापक मुकेश येवले सर व राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष एडवोकेट देवकांत पाटील यांनी तालुक्याच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी यांचा सत्कार केला याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष हितेश गजरे समन्वयक गोलू माळी गिरीश पाटील आसिफ खान रहिम रजा आदी उपस्थित होते या कार्यक्रमात चुंचाळे ग्रामपंचायत मध्ये सौ सुनंदा पाटील यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावल यांच्यावतीने व जिल्ह्याच्या वतीने वंदना ताई चौधरी यांनी सुनंदा पाटील यांचा सत्कार केला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button