Nandurbar

गुन्हा दाखल झाले नंतर काही तासाचे आत चोरीचे आरोपीतांचा शोध घेण्यात पोलीसांना आले यश

गुन्हा दाखल झाले नंतर काही तासाचे आत चोरीचे आरोपीतांचा शोध घेण्यात पोलीसांना आले यश

फहिम शेख/नंदुरबार

दिनांक-26/02/2022 रोजी रात्री 09.30 ते दिनांक 27/02/2022 रोजी सकाळी 09.30 वाजेचे दरम्यान नंदुरबार शहरात बायपास रोड वरील राजपुत पेट्रोलपंपा समोर मोकळ्या जागी उभे असलेला ट्रक क्रमांक एम.एच. 39 सी. 1049 हिचेमध्ये असलेले साखरेचे 14 कट्टे हे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ट्रक चे ताडपत्री उचकवुन चोरुन नेले बाबत फिर्यादी संभाजी शिवाजी मराठे वय-32 धंदा-ड्रायव्हर रा. देवाचे वेल्हाणे ता.जि.धुळे ह.मु. सुर्यवंशी नगर नवापुर रोड नंदुरबार यांचे तक्रारी वरुन दिनांक 27/02/2022 रोजी नंदुरबार शहर पो.स्टे ला गु.र.न. 136/2021 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील गेल्या मालाचा व गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचा तात्काळ शोध घेवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माला पैकी 15200/- रु किंमतीचे 08 साखरेचे कट्टे आरोपी नामे हरीष मराठे रा. देसाईपुरा नंदुरबार याचे कडुन जप्त केले आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असुन आरोपी कडुन उर्वरित मुद्देमाल हस्तगत करणे काम सुरु आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पो.स्टेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर सो, पोसई/मुकेश पवार सो, पोहेकॉ/संदिप गोसावी, पोहेकॉ/अतुल बिऱ्हाडे, पोना/भटु धनगर, पोकॉ/कल्पेश रामटेके पोकॉ/विजय नागोडे, पोकॉ/हेमंत बारी पोकॉ/दिनेश चव्हाण पोकॉ/191 विशाल मराठे यांनी केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button