Nashik

अॅड. सुभाष सोनवणे यांच्या निधनाने सामाजिक व सहकार क्षेत्रातील समर्पित व्यक्तीमत्व हरपले – मंञी छगन भुजबळ

अॅड. सुभाष सोनवणे यांच्या निधनाने सामाजिक व सहकार क्षेत्रातील समर्पित व्यक्तीमत्व हरपले – मंञी छगन भुजबळ

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला तालुक्यातील अदरंसुल येथील स्व. गोविंद नाना सोनवणे यांचा समाजसेवेचा वारसा अविरतपणे सुरु ठेवणारे अॅड. सुभाष सोनवणे यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, सहकार क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्व हरपले असल्याच्या शोक भावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

शोक संदेशात छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, शांत,संयमी स्वभावाचे असलेले अॅड. सुभाष सोनवणे यांनी येवला तालुक्यातील सहकार महर्षी स्व.गोविंद नाना सोनवणे यांचा सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील लोकसेवेचा वारसा त्यांनी धीरोदात्तपणे सांभाळला. नाशिक शहरात असलेल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी काम करतांना त्यांनी या संस्थेचा
विस्तार करण्यात मोलाचे योगदान दिले.

शैक्षणिक संस्थांसह त्यांनी सहकार महर्षी गोविंदनाना सोनवणे सहकारी पतपेढीचे कार्यकारी संचालक, अंदरसुल अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक या बँकेचे संस्थापक आणि अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडल या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक ही पदे भूषविली. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सहकार क्षेत्राचा वसा जपणारे समर्पित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून मी व माझे कुटुंबीय सोनवणे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो असे छगन भुजबळ यांनी शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button