Amalner

Amalner: मंगरूळ येथील विधवा महिला बनताय उयोजक…! पापड उद्योग सुरू…चला पंखांना बळ देऊ या..!

मंगरूळ येथील विधवा महिला बनताय उयोजक…! पापड उद्योग सुरू…

व्हाॅटअॅप वरिल केलेल्या आव्हानाची दखल घेऊन अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावातील विधवा महिलांनी केली एका पापड बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ या गावातील पाणी फाउंडेशन च्या समृद्ध गाव योद्ध्या उमेद अभियाना च्या कृषी सखी सुनंदा पाटील व बचत गटाच्या रेखा घोलप या दोघींनी मी मोताळा तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना चा सुरू असलेला पापड व्यवसाय आमच्या पाणी फाउंडेशन च्या दैनंदिनी ग्रुप वरती आमचे सहकारी मिञ मोताळा तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिरे व निलेश बडे त्यांनी मोताळा तालुक्यामध्ये काही महिलांच्या बचत गटाच्या नागली पापड व इतर पापड बनवण्याच्या व्यवसायाची सविस्तर माहिती टाकली होती त्या महिलांची पोस्ट व माहिती मी अमळनेर तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेतील सर्व गावातील ग्रुप वरती पाठववली व त्या मोताळा तालुक्यातील बचतगटांच्या महिलांची प्रेरणा घेऊन अमळनेर तालुक्यातील उमेद अभियाना च्या बचत गटाच्या महिलांनी आपला नागली पापड बनवणे व्यवसाय प्रेरणा घेऊन करावा असे आव्हान केले होते त्या आव्हानास दाद देऊन मोताळा तालुक्यातील महिलांची प्रेरणा घेऊन अमळनेर तालुक्यातील मंगरूळ या गावातील सुनंदाताई रेखाताई यांनी मंगरूळ गावातील ज्योती घोलप व जोती घोलप या विधवा महिलांना सोबत घेऊन अवघ्या दुसऱ्याच दिवशी नागली पापड बनवण्याचे काम सुरू केले हे काम सुरू केल्यानंतरच त्यांना लगेचच मंगरूळ गावातील नाशिक या शहरात राहनार्‍या व्यक्तिकडून एक 7 किलो व दूसरी मंगरूळ गावातून 25 किलो नागली पापड बनवण्याची ऑर्डर आली व या दोन्ही धाडसी व जिगरबाज ध्येयवेड्या महिलांनी त्या दोन दिवसांमध्ये पापड बनवून दिले अलेल्या मागणी पूर्ण केल्या व या व्यवसायाची एक चांगली सुरुवात केली या ध्येयवेड्या रेखाताई सुनंदाताई यांच्या कार्यास पाणी फाउंडेशन चा व ठोस प्रहारचा सलाम ..

तर आपणास कोणास नागली पापड व ऊडिद पापड चांगल्या प्रकारचे व योग्य भावात हवे असतील तर आपण या विधवा व प्रयत्नवादी महिलांना नागली पापड बरोबर इतर पापड बनवण्याची मागणी देऊन या विधवा महिलांना सबला व व्यावसायिक बनण्याची संधी देऊन सेवा सक्षम बनवू शकता माहितीसाठी मोबाईल नंबर या सबला महिलाचे नंबर7741928820,7058453166

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button