India

NCB ने छोटे मासे पकडण्याऐवजी अदानी च्या बंदरावर सापडलेल्या 3000 किलो संदर्भात कार्यवाही का करत नाही..?

NCB ने छोटे मासे पकडण्याऐवजी अदानी च्या बंदरावर सापडलेल्या 3000 किलो संदर्भात कार्यवाही का करत नाही..?

मुंबई नुकतेच एका जहाजावर छापे मारी करत NCB ने ड्रग्ज पार्टी करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात आता काँग्रेस च्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी NCB निशाणा साधत क्रूझवरील छोटे मासे पकडण्यात व्यस्त असणारी NCB अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हिरॉईनसंदर्भात मात्र…गुपचूप आहेत असा टोला मारला आहे.

NCB ने कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणाबाबत काँग्रेसने काही गंभीर आरोप केले आहेत. क्रूझवर सापडलेले अमली पदार्थ आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक या प्रकरणावर भाष्य करत काँग्रेसचे नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एनसीबीचे अधिकारी या क्रूझ प्रकरणातील कारवाईच्या माध्यमातून छोट्या माश्यांच्या मागे लागले आहेत. मात्र त्याचवेळी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात ही केंद्रीय संस्था शांत का आहे अशी टीका आणि प्रश्न देखील विचारला आहे.

एनसीबी अदानीला राजाश्रय देत आहेत का? मोठ्या डिलरला संरक्षण का देत आहे आणि कोणाच्या आदेशानुसार देत आहे? असा प्रश्न शमा यांनी विचारला आहे.

क्रूझ वरील छाप्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड इ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व क्रूझ वर उपस्थित लोकांचे रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.तसेच आर्यन खानसह, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज र्मचट यांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button