Maharashtra

विजेचा धक्का का बसतो ?

विजेचा धक्का का बसतो ?

प्रविण पाटील

साधा दिवा लावायला जावं किंवा गरमउ पाण्यासाठी गिझर चालू करायला जावं आणि विजेचा धक्का बसावा असा अनुभव कित्येक वेळा आलेला असतो वास्तविक ही उपकरणे चालू करण्यासाठी असलेली बटनं इन्शुलेटेड केलेली असतात म्हणजेच त्यांच्या बाह्यांगामधून विजेचा प्रवाह खेळणार नाही अशी व्यवस्था केलेली असते. पण कधी कधी या व्यवस्थेला कुठेतरी तडा जातो आणि केवळ अंतरंगातूनच खेळणारी वीज या बाह्यांगातही प्रवेश करते तिच्याशी आपला संपर्क आला की मग आपल्याला विजेचा धक्का बसतो हे असं का होतं असा सवाल त्या धक्क्यानं गांगरुन गेल्यावरही आपल्या डोक्यात धुमाकूळ चालत राहतो

विद्युतबल हे विश्वाच्या जन्मापासून अस्तित्वात असलेलं मूलभूत बल आहे विश्वाचा गाडा सुरळीत चालू राहण्यात ते महत्त्वाची भूमिका वठवत असतं विद्युतबलामध्ये ऋण आणि धन असे दोन विद्युतभार असतात सामान विद्युतभार एकमेकांना दूर लोटतात तर विषम विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात पण अशा एकमेकांकडे ओढ असणाऱ्या एक धन आणि दुसरा ऋण अशा विद्युतभारांना आपण एकमेकांपासून काही अंतरावर ठेऊ शकतो त्यापोटी मग त्या दोन भारांमध्ये स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते यालाच आपण विद्युत पोटेन्शियल म्हणतो जर ते दोन टोकांवरचे भार एकत्र आले तर ही ऊर्जा व्होल्टेजच्या रूपात मोकळी होते. दूरवर राहूनही त्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्यामधून विद्युतभार सहजगत्या वाहू शकतो असे विद्युतवाहक करतात तांब्याची तार किंवा साधं पाणी सुद्धा चांगले विद्युतवाहक आहेत अशा तारेनं जर ते विद्युत भार जोडले गेले तर त्या वाहकातून म्हणजेच तारेतून विद्युतप्रवाह वाहू लागतो याउलट लाकूड किंवा पोर्सेलीन यांच्यामधून विद्युतप्रवाह सहजगत्या वाहू शकत नाही हे पदार्थ त्या प्रवाहाला विरोध करतात त्यामुळे ते विद्युतरोधक बनतात प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी अशा विद्युतरोधकांचा वापर केला जातो

आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले शरीरही चांगलं विद्युतवाहक असतं त्यामुळे एका टोकाच्या विद्युतभाराशी आपल्या शरीराचा संपर्क आला तर शरीरातून विद्युतप्रवाह वाहू लागतो त्यापोटी उद्भवणाऱ्या व्होल्टेजपोटी अनेक शरीरक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात होल्टेजचं प्रमाण जास्त असेल तर या अडथळ्यांची मात्राही जास्त असते जोरदार धक्का बसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते

विद्युतप्रवाह नेहमी धन विद्युतभाराकडून ऋण विद्युतभाराकडे वाहत असतो आपला संपर्क धन विद्युतभार असलेल्या टोकाशी झाला की विद्युतप्रवाह दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋण विद्युतभाराकडे वाहू लागतो अर्थात दुसऱ्या टोकाला असा ऋण विद्युतभार असण्याची आवश्यकता असते जेव्हा आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा तसा तो असतो; पण आपण लाकडावर जर उभे राहिलो तर दुसऱ्या टोकाला असा विद्युतरोधक असल्यामुळे विद्युतप्रवाह वाहू शकत नाही त्यामुळे धक्का बसण्यापासून आपली सुटका होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button