Maharashtra

स्त्रियांना दाढी का नसते ?

स्त्रियांना दाढी का नसते ?

प्राचीन इजिप्तमध्ये हातशेपसुत नावाची एक राणी होती ती हनुवटीवर एक खोटी दाढी लावून वावरत असे. आपलं स्त्रीत्व लपवण्यासाठी तिनं हा खटाटोप केला होता कारण राजगादीवर पुरुष वारसांनीच बसावं, असा प्रघात होता त्यामुळे तिच्या गादिवरच्या हक्काला सहजासहजी मान्यता मिळणार नव्हती तेव्हा आपणही पुरुष आहोत असं दाखवण्यासाठी तीनं या खोट्या दाढिचा आधार घेतला होता तसा तिनं करावं याचं राजकीय कारण जरी स्पष्ट झालं असलं तरी तिला किंवा एकंदरीतच स्त्रियांना दाढी का नसते हा प्रश्न उरतोच
पुरुषांनाही दाढी वयात आल्यानंतरच येते. त्यामुळे या नैसर्गिक आविष्कारात वयात येताना सर्वांच्याच शरीरात जो संप्रेरकांच्या पाझराचा खेळ सुरू होतो त्याचा सहभाग असावा हे निश्चित जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावर लव असते काहींच्या अंगावर तशी ती जास्तच असते. अशा केसाळ मुलाच्या अंगावरची लव घालवण्यासाठी आई आणि दाई त्याला अंघोळ घालताना हळदीचा लेप चोळत असतात वास्तविक त्याची काहीच गरज नसते कारण मूल मोठं होत जातं तशी ही लव हळूहळू नाहीशी होत जाते

तिच्यात मोठा फरक होतो तो ते मूल वयात येताना त्या वेळी त्या मुलाच्या लिंगानुसार वेगवेगळ्या लैंगिक संप्रेरकांचा पाझर मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मुलींच्या शरीरात स्त्रैण संप्रेरकांचा स्त्राव सुरू होतो त्यांच्या प्रभावाखाली शारीरिक तसंच शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडून येतात स्त्रियांच्या शरीराला गोलाई येते स्तनांची वाढ होऊ लागते जननेंद्रियांचीही वाढ होते मासिक पाळी सुरू होते या सर्वांबरोबरच अंगावरची लव कमी कमी होऊ लागते आणि डोक्यावरच्या केसांची वाढ सुरू होते चेहऱ्यावरच्या केसांच्या वाढीलाही विरोध होतो त्यांची वाढ दाबली जाते अर्थात काहीजणींच्या बाबतीत ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरळीत पार पडत नाही त्यामुळे काही मुलींच्या हनुवटीवर थोडेफार केस दिसू लागतात पण त्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य असतं
मुलांच्या शरीरात याच वेळी पुरुषी संप्रेरकांच्या स्त्रावाला सुरुवात होते. त्यांच्या प्रभावापोटी त्यांच्याही शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये बदल होतात जननेंद्रियांची वाढ होते. छाती रुंदावते भरदार होऊ लागते उंचीतही वाढ होते. आवाज फुटतो. त्याचबरोबर मिसरूडं आणि दाढीही फुटते कारण त्या संप्रेरकांच्या स्त्रावापोटी अंगावरची लव केसांमध्ये बदलते चेहऱ्यावरच्या केसांचीही वाढ होऊ लागते डोक्यावरच्या केसांची वाढ मात्र मंदावते ती अति मंदावली तर मग टक्कलही पडतं. त्या मंदावण्याच्या वेगावर टक्कल केव्हा पडेल हे ठरतं काही जणांना लहान वयातच ते पडतं, तर काही जण सत्तरीतही केसांचा फुगा पाडू शकतात
स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये निसर्गानं जे काही फरक केले आहेत त्यांच्या परिपाकापोटी स्त्रियांना दाढी येत नाही
तर पुरुषांनाच टक्कल पडतं

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button