India

पत्त्यांच्या चार राजांमध्ये एका राजाला मिशी का नाही..?

पत्त्यांच्या चार राजांमध्ये एका राजाला मिशी का नाही..?

पत्ते खेळणे हा तसा संपूर्ण जगात एक प्रसिद्ध आणि करमणुकीचे साधन आहे.पत्त्यांच्या गड्डीत 52 पत्ते असतात आणि सर्व पत्ते हे 1 ते 10 आणि त्यानंतर जोकर,राणी,बादशहा किंवा राजा असे प्रत्येकी चार चार रंगाचे आणि निशान असलेले असतात.यात किलवर,इस्पिक,चौकट आणि बदाम असे चार प्रकार असतात.आता नुकताच दिवाळी हा सण गेला आणि दिवाळीत भारतात पत्ते खेळण्याची प्रथा आहे. अचानक विषय समोर आला की ह्यातील चार राजांपैकी एका राजाला मिशी का नाही ?चला तर मग जाणून घेऊ या काय आहे कारण..!

मिशा असलेला पुरुष हा मर्दानी असतो असे म्हणतात. ५२ पत्त्यांच्या एका संचाला डेक म्हणलं जातं. पत्त्यांचा खेळ खूप जुना आहे. 16 व्या शतकात या खेळाला सुरुवात झाली .18 व्या शतकाच्या उत्तरार्धात या डेकला रिडिझाईन करण्यात आले.

बदाम, चौकट, इस्पिक आणि किलवर त्यांचा शोध एका फ्रेंच व्यक्तीने सर्वप्रथम लावला. यामुळेच राजा, राणी आणि जोकर किंवा गुलाम ही पत्त्यांतली चित्रं पाहिली तर लक्षात येईल, की यांची चेहरेपट्टी ट्यूडर राज्यकर्त्यांच्या वेषभूषेशी मेळ खाणारी आहे.18 व्या शतकात पत्त्यांचं रिडिझाईन केलं गेलं मात्र हा तोंड तशीच ठेवण्यात आली. यातले सर्व राजे, राण्या आणि गुलाम हे विविध राजांवरून घेतले गेले आहेत. म्हणूनच वरवर बघता हा बैठ्या मनोरंजनाचा खेळ वाटला, तरीही तो राजकीय पट रंगविणारा खेळ आहे.
इस्पिक राजा (किंग ऑफ स्पेड्स) – प्राचीन इस्त्रायलचा किंग डेव्हिड
किल्वर राजा (किंग ऑफ क्लब) – मेसाडोनियाचा महान किंग सिकंदर
चौकट राजा (किंग ऑफ डायमंड) – रोमन राजा किंग सीजर ऑगस्टस
बदाम राजा (किंग ऑफ हार्ट) – फ्रान्सचा राजा किंग शारलेमेन, हा रोमन साम्राज्याचा पहिला राजा मानला जातो.

ह्या संदर्भात अनेक दंतकथा आहेत जेव्हा पत्त्यांचं डिझाईन केलं गेलं तेव्हा चित्रकार चुकून बदाम राजाला मिशा काढायच्या विसरून गेला आणि नंतर तीच प्रथा पाळली गेली.
याविषयी सांगितली जाणारी दुसरी कथा महत्वपूर्ण आहे. या कथेनुसार बदाम राजा हा किंग शारलेमेनवरून चितारला गेला. हा राजा दिलदारपणासाठी आणि त्याच्या देखणेपणासाठी प्रसिध्द होता. इतरांहून आपण वेळे दिसायाला हवे या विचारातून या राजाने स्वत:च्या मिशा छाटून टाकल्या होत्या.
त्याकाळात बिनमिशीचा पुरुष अपवादाने असे. उलट दाढी मिशांचं जंगल असणारे पुरुषी चेहरे सर्वत्र दिसत. किंग शारलेमेननं मिशा काढून चेहरा स्वच्छ केला आणि त्याच्या देखणेपणात भर पडली. म्हणूनच या देखण्या आणि लोकप्रिय राजाच्या आठवणीत बदाम राजा बनविला गेला.
बदाम हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं आणि अशा प्रेमरंगाचा राजा असणार्‍या शारलेमेनची आठवण बदाम राजाच्या रुपात चिरतरूण ठेवली गेली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button