India

डॉक्टर पांढऱ्या आणि वकील काळ्या कोटातच का..?कधी केला आहे हा विचार..?जाणून घ्या कारण..!

डॉक्टर पांढऱ्या आणि वकील काळ्या कोटातच का..?कधी केला आहे हा विचार..?जाणून घ्या कारण..!

आपल्या आजूबाजूला नेहमी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात.पण आपण त्या कडे साधारणपणे दुर्लक्ष करतो.गोष्ट खूप छोटी असते पण जिज्ञासा आणि कुतूहल असेल तर त्यातून हे देखील उपयुक्त माहिती मिळते.आपल्या नेहमीच्या जीवनात डॉक्टर आणि नर्स हे खूपच महत्वाचे घटक आहेत. सध्या कोरोना काळात तर डॉ,दवाखाने,नर्स आणि कोरोना हे समीकरणच झाले.आपण नेहमी डॉक्टरांना पांढऱ्या कोटमध्ये पाहतो पण कधी च यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाही. डॉक्टरां प्रमाणेच भारतात वकील कोर्ट कचेरी हे देखील खूप महत्वाचे आहेत.आजही भांडण झाले तर मी तुला कोर्टात पाहून घेईल अशी धमकी दिली जाते. भारतीयांचा न्याय पालिकेवर नितांत विश्वास आहे.कोर्टात सर्वच वकील ,न्यायाधीश काळ्या कोटात असतात.चला तर मग जाणून घेऊ यामागील कारण..
वकिलांचा काळा ड्रेस असावा अशी सुरुवात १७ व्या शतकात झाली.
जेव्हा राणी मेरी II ला कांजण्या झाल्या मुळे १६९४ मध्ये ती वारली तेव्हा राजा किंग विलीयम्स 3 राने तिच्या मृत्यूप्रीत्यर्थ राणीला श्रद्धांजली म्हणून सर्व न्यायाधीश आणि वकिलांना काळा गाऊन घालून कोर्टामध्ये जाण्याची आज्ञा केली.असे काही लोकांचे म्हणणे आहे तर या काळात रंगीत कपडे जास्त उपलब्ध नसत.
जांभळा रंग हा श्रीमंतीशी जोडला गेला असल्याने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला दुसरा एकच रंग होता तो म्हणजे काळा. त्यामुळे काळा रंग त्यांनी निवडण्यात आला असे काहींचे म्हणणे आहे. काळा रंग हा वर्चस्वाचा रंग मानला जातो. काळ्या वेशातील माणूस हा जास्त शक्तीशाली आणि प्रभावी वाटतो.तसेच
काळा कोट हा वकिलांना असलेल्या आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्याचा अधिकार आणि न्यायाधीशांना असलेला न्यायदानाचा अधिकार, त्यांच्यातील एकजूट सूचित करतो.
ब्रिटिश काळापासूनच न्यायाधीश आणि वकिलांसाठी काळा गाउन आणि विग वापरण्याची सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच हे प्रतिष्ठित क्षेत्र मानले गेले.
काळा रंग हा न्यायाचा तसेच सुरक्षेचा देखील रंग आहे.ऍडव्होकेट ऍक्ट १९६१ नुसार, भारतातील सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रीक्ट तसेच ट्रिब्युनल कोर्टामध्ये येणाऱ्या सर्व वकिलांनी काळ्या युनिफॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे.

आता डॉक्टर का पांढरा कोट का घालतात ते पाहू…
पांढरा रंग हा शांती आणि सलोख्याचे प्रतीक मानला जातो. डॉक्टरांचे काम असते आपल्या पेशंटवर उपचार करणे आणि त्यांना धीर देणे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडवणे.
पांढरा रंग हा शांती, पवित्रता, इमानदारी दर्शवितो. डॉक्टरांनी पांढरा कोट वापरण्याची सुरुवात विसाव्या शतकात झाली.
१९व्या शतकापर्यंत उपचार करणारे physicians रुग्णांशी संपर्क करताना काळा पोशाख करत.
१९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीस जेव्हा वैद्यकीय क्षेत्र हे पूर्णतः वैज्ञानिक म्हणून नावारूपाला आले तेव्हा या क्षेत्राची पवित्रता कायम राखण्यासाठी पांढरा कोट घातला जाऊ लागला.
पांढरा कोट हा डॉक्टर आणि रुग्णांमधील दुवा म्हणून तर डॉक्टर आणि त्यांच्या भोवतालच्या वातावरणात एका भिंतीसारखे काम करतो. डॉक्टर हे रुग्णांच्या शरीराशी संपर्कात येतात.
शिवाय पांढऱ्या कोटवर लगेचच रक्ताचे, औषधांचे, रसायनांचे डाग दिसून येत असल्याने त्यांना आपले कपडे खराब झाल्यावर बदलावे लागतात आणि त्यामुळे ते आपोआपच स्वच्छ राहतात. यामुळे त्यांच्यातर्फे इन्फेक्शन पसरण्याला आळा घालता येतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button