Pandharpur

प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा अहवाल सादर करताच जयंत पाटील कडून मिळाली शाबासकीचीच थाप !

प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा अहवाल सादर करताच जयंत पाटील कडून मिळाली शाबासकीचीच थाप !

प्रतिनिधी
रफिक आत्तार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग व कोकण दौर्‍याबद्दलचा अहवाल उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांनी दिला असता, सर्व अहवाल पाहून पंढरपूरचे रहिवासी असलेल्या उद्योग व्यापार विभागचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्याचे कौतुक करीत जणू शाबासकीची थाप मिळाली आहे .
मागील काही महिन्यांपूर्वी नागेश फाटे यांना राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी देत उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले होते. हे पद आपण शोभेचे बाहुले म्हणून न वापरता मिळालेल्या या संधीचा आपण पक्षाला पुरेपुर फायदा करून देण्यासाठी , राज्यभर जिल्हानिहाय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटी आणि बैठक कार्यक्रम सुरू केला.मागील दोन महिन्यांत राज्यातील मराठवाडा ,विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, आणि प.महाराष्ट्रतील काही भागाचा दौरा झाला होता, त्याचाही अहवाल दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे सादर करण्यात आला होता, त्यावेळी पवार यांनीही नागेश फाटे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.यानंतर सध्या सुरू असलेल्या या दौऱ्यात कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जेष्ठ नेतेमंडळी व सेलचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून उद्योग व व्यापार या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना संगठीत करून पक्षाची ताकद
वाढविण्यासाठी कोकण दौरा केला .यावेळी सुरुवातीला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कृषी औद्योगिक शैक्षणिक क्रांतीचे जनक राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय कै .राजारामबापू अनंत पाटील यांचा आशीर्वाद व प्रेरणा घेऊन पुढे स्वर्गीय आ .आर. आर . पाटील यांच्या सुविद्य पत्नी आ .श्रीमती सुमन . आर .पाटील यांची भेट घेऊन पुढे कोल्हापूर येथे ग्राम विकास व कामगार मंत्री ना . हसन मुश्रीफ यांची भेट घेतली ,तदनंतर सिंधुदुर्ग येथे माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, तदनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघाचे विद्यमान आ .शेखर निकम यांच्या निवास्थानी भेट देऊन भ्रमण ध्वनी वरून संपर्क साधला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार मा सुनीलजी तटकरे साहेब यांना भ्रमणध्वनी कोकण दौऱ्याची सविस्तर माहीती देण्यात आली. त्यांचे मार्गदर्शन घेवून पूढे पनवेल व नंतर कल्याण-डोंबिवली उल्हासनगर भिवंडी वसई विरार येथे आढावा बैठक घेऊन ठाणे येथे गृहनिर्माण मंत्री ना . जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांची भेट घेतली ,अशाप्रकारे उद्योग व व्यापार विभागाचा सविस्तर अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांना भेटून सविस्तर चर्चा व कोकण दौरा बद्दल संपूर्ण माहिती दिली.
यावेळी ना . जयंतराव पाटील यांनी अशाचप्रकारे संघटन बांधणी चालू ठेऊन राष्ट्रवादीचे काम जनतेपर्यंत पोहचवा असा मोलाचा सल्लाही देवून कामाचे कौतूक केले .यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनेश मोरे उदयोग व व्यापार विभागाचे कल्याण कुसूमडे समवेत होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button