sawada

भुसावळ न.पा.उर्दू शाळेतील शिक्षक दुसरी शाळेचा चेयरमन म्हणून कारभार संभाळते तेव्हा!

भुसावळ न.पा.उर्दू शाळेतील शिक्षक दुसरी शाळेचा चेयरमन म्हणून कारभार संभाळते तेव्हा!

—————————————-
“शाळा समिती चेयरमनच्या संमती व सहीने शाळेत नविन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा तसेच कर्मचारीस पदमुक्त,निलंबित करण्यासह शाळेचा बँकिंग आर्थिक व्यवहार व पोषण आहार इत्यादी महत्वाचे कामकाज चालवण्याचे अधिकार सोबत त्याची अतिशय महत्त्वाची भूमिका असते.तरी दुसऱ्या ठिकाणी नोकरीवर कार्यरत सरकारी कर्मचारीने सदरील चेयरमन पद घेण्यापुर्वी त्याचे वरिष्ठ अधिकारीची पुर्वपरवानगी घेणे गरजेचे नाही का?तरी याकडे सुद्धा प्रशासन अधिकारी सोनवणे सो.यांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील भुसावळ येथील न.पा. उर्दू शाळा नं.३ मध्ये कार्यरत शिक्षक शेख इक्बाल शेख कादर मन्यार गेल्या ३ वर्षापासून ॲंग्लो उर्दू हायस्कूल सावदा या शाळेची शाळा समितीचा चेयरमन पद भूषवित असून सदर शाळेचे सर्व कारभार नियमित संभाळतांना दिसून येते.व यासाठी तो आठवड्यातून ३ ते ४ दिवस भुसावळ ते सावदा वारी करीत असतो.यामुळे निदर्शनास येते की,ज्या शाळेत शाळकरी मुलींना विद्यादान करण्याचे शासन त्यांना चांगल्याप्रकारे दर महिन्याला मानधन देत असतो त्याचे कोणतेच भान न ठेवता शिक्षक शेख इक्बाल हे सावदा वारीत मग्न दिसून येण्या मागील कारण काय? याबाबत वृत्तपत्रात सविस्तर बातम्या देखील प्रसिद्ध होत आहेत.सदर प्रकरणी या आधी माध्यम प्रतिनिधी यांनी प्रशासन अधिकारी सोनवणे सो.याच्याशी फोनद्वारे चर्चा केली असता त्यांनी याकडे निश्चितच लक्ष दिले जाईल.असे सांगितले होते.तरी अचानक पणे त्यांनी स्वत: भुसावळ येथील शाळेत चौकशी केल्यास निश्चितच या सावदा वारी करणाऱ्या शिक्षकाची पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र खरे आहे.

तसेच सदर शिक्षकांनी सावदा येथील ॲंग्लो उर्दू शाळेचे चेयरमन पद घेण्यापुर्वी संबंधित शिक्षण विभागाचे वरिष्ठ सक्षम अधिकारी कडून नियमानुसार पुर्व परवानगी घेतली होती का?चेअरमन पदी शिक्षक शेख इक्बाल शेख कादर मन्यार यांची निवड करण्यासाठी सदर शाळेची संस्था म्हणजे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा चे अध्यक्ष,सचिव यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली होती का?याबाबत सदर संस्थाचे प्रभूख पदाधिकारी चौकशी करून सदरील शिक्षकाचे चेयरमन निवड रद्द करतील का?असे आव्हान आत्मक प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात की तत्परता दाखवून पुढील योग्यती कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button