World

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर लॉन्च..!पहा काय आहे पोल फिचर..!

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर लॉन्च..!पहा काय आहे पोल फिचर..!

एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे नवे ‘पोल फिचर’ (Poll Feature) व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपसाठी असणार आहे. यामध्ये ग्रुप पोल म्हणजे मतदान घेता येईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फिचरमुळे युजर्सना त्यांच्याशी संबंधित विषयांवर गट निवडून मतदान (Poll) घेता येईल. हे फिचर आधी आयफोन वापरकर्त्यांसाठी आणि नंतर Android आणि डेस्कटॉप युजर्ससाठी उपलब्ध होईल. हे नवे फिचर कधीपर्यंत येईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

पोल फिचर (मतदान) फक्त ग्रुपमध्ये वापरता येईल. वैयक्तित चॅटमध्ये याचा वापर करता येणीर नाही, कारण तेथे केवळ दोन युजर असतात. हे फिचर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवण्यासाठी मतदानाचा प्रश्न प्रविष्ट करण्यास सांगते. अद्याप हे फीचर विकसित होत असल्यामुळे इतर तपशील अद्याप उपलब्ध नाहीत. परंतु अहवालानुसार, याची पुष्टी झाली आहे की व्हॉट्सअ‍ॅपची लवकरच पोल फिचर सुरू करण्याच्या तयारीत आहे.

यामध्ये तुम्ही मतदान करु शकता, तसेच प्रश्न विचारू शकता आणि इतर उत्तरासाठी मत देऊ शकतात. मतदान फक्त WhatsApp ग्रुपमध्ये उपलब्ध असेल आणि ते एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. याशिवाय तुमची उत्तरे, निवडणूक आणि निकाल केवळ ग्रुपमधील सदस्यच पाहू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप आता हे फिचर व्यवस्थापित करण्यासाठी सेटिंग्ज रोलआउट करत आहे. Meta च्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप अधिक परस्परसंवादी आणि हायपर बनवण्यासाठी नवीन फिचरची जोड देण्यात येत आहे. स्पर्धेसोबतच अपडेट राहण्यासाठी बदलही आवश्यक आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button