Maharashtra

महावितरणचा अंदाजे वीज बिलातून ग्राहकांना शॉक

महावितरणचा अंदाजे वीज बिलातून ग्राहकांना शॉक

प्रतिनिधी महेश शिरोरे

देवळा तालुका व ग्रामीण भागातील कोरोना विषाणू या संसर्गच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज बिल महावितरण विभागाने देऊन शॉक केले असून, या लॉकडाऊन काळातील 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे या आशयाचे निवेदन रयत क्रांती संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष रविंद्र शेवाळे यांनी देवळा वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले आहे.कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग-व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण होत आहेत ,उद्योग व्यवसाय हातमजुरी करणारे मजूर, व मजुरी काम करणाऱ्याचे काम धंदे बंद असल्याने त्यांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण होत असल्याने नागरिकांना लॉकडाऊन काळातील 200 युनिटचे संपूर्ण वीज बिल माफ करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा .सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून आर्थिक संकटाचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीकडून ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आलेली आहेत. एकीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झालेला असताना देखील वाढीव वीज बिलामुळे ग्राहकांच्या डोकेदुखीत आणखीनच भर पडली आहे. राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असून ,लॉकडाऊनकाळातील प्रतिमहिना 200 युनिटचे वीज बिल माफ करणे ,एप्रिल महिन्यापासून करण्यात आलेली वीज दरवाढ मागे घ्यावी या सर्व मागण्या रयत क्रांती चे तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे यांनी या निवेदनाच्या प्रति ,ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, महावितरण कंपनीच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या जवळ निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत. तात्काळ वीज माफीचा निर्णय शासनाने घेतला नाही तर रयत क्रांती संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा रयत क्रांती संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे ,वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, दत्तू हिरे आदींसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
छाया– (महेश शिरोरे ) महावितरण विभागाने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देऊन ग्राहकांची डोकेदुखी वाढविली असल्याने संबंधित महावितरण विभागाने लॉक डाऊन काळातील 200 युनिटचे वीज बिल माफ करावे या आशयाचे निवेदन उपकार्यकारी अभियंता देवळा तसेच सह्ययक अभियंता ठेंगोडा यांना देताना रवींद्र शेवाळे, आण्णा पाटील ,दत्तू हिरे आदी)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button