Amalner

Amalner: चोरी के पिछे क्या हैं..? नाट्यगृहातील लाखो रु चे “सामान” चोरीला..!

चोरी के पिछे क्या हैं..? नाट्यगृहातील लाखो रु चे “सामान” चोरीला..!

अमळनेर येथे अमळनेर नगर परिषद नाट्यगृह उभारण्यात आले.सुरुवाती पासून हे नाट्यगृह वेगवेगळ्या कारणांस्तव वादात राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह कोणी सांभाळावे ह्यावर अनेकदा वाद झाले पण नंतर ह्या नाट्यगृहाची देखभाल करण्याचे व्यवस्थापन खाजगी ठेकेदाराला देण्यात आले. ही प्रक्रिया देखील इतकी गुपचप पार पडली की याचा थांगपत्ता देखील कोणाला लागला नाही. जेंव्हा काही मंडळी कार्यक्रम घेण्याची परवानगी मागण्यास गेली तेंव्हा कळलं की नाट्यगृह आता नगरपरिषदेच्या “ताब्यात” राहील नाही.मग सुरू झाली ती चर्चा..आणि पैश्यावरून वाद ..ह्या सर्व गोष्टीला एकच महिना झाला आणि नाट्यगृहात चोरी झाली आहे.. बर चोरी थोडी थाडकी नसून लाखोंच्या घरात आहे. एकूण साडे सोळा लाख रु किंमतीच्या वस्तू नाट्यगृहातुन चोरीस गेल्या पण याची कुठेही तक्रार किंवा गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही..आज सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी छत्रपती शिवराय नाट्य गृह मधील वस्तू चोरी संधर्भात तातडीने FIR दाखल करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

यात असे म्हटले की मागील काही दिवसापूर्वी छत्रपती नाट्य गृह यात भली मोठी चोरी झाली असे समजते त्यात साऊंड सिस्टम आणि इतर महागड्या वस्तू चोरी गेल्यात. तरी माझ्या माहिती नुसार सुमारे र.रु. 16,50,000/- (सोळा लाख पन्नास हजार रुपये मात्र) तरी यासंदर्भात आपण काही न.पा. कर्मचाऱ्यांना घेऊन पंचनामा देखीत केला असे समजते. याबाबतची वाच्यता कुठल्याही वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली नाही. हे नवलव म्हणून सदरीत चोरी संदर्भात कानोसा घेतला असता अजून न.पा अमळनेर यांच्या स्तरावरून FIR दाखत केती गेली नाही असे कळते. जर नागरिकांच्या करमणूककरातून हे मते मोठे नाट्यगृह बांधण्यात आले आणि त्यात एवढी मोठी चोरी झाली त्या बाबत आपण का म्हणून IR दाखल केली
नाही कृपया कळवावे.

छत्रपती नाट्यगृहाती वस्तु चोरी संधर्भात आपण खुलासा करावा व चोरी संदर्भात अमळनेर पोलीस स्टेशन येथे FIR नोंदा करावी. जेणे करून चोरटे पकडले जातील.
याविषयावर अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी लागला नाही.ते नॉट रीचेबल होते…अमळनेर करांना आता हा मोठा प्रश्न पडला आहे की चोरी कोणी केली..? शासकीय ठिकाण देखील सुरक्षित नाहीत का..? ह्या चोरी मागे नेमकं काय गौडबंगाल आहे..? चोरीचा उद्देश काय असावा..? हे चोर खरे चोर की पांढरपेशे चोर..? सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत का..?असेही शहर व तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे.. ह्या चोरी मागे कोण..? FIR का दाखल करण्यात आली नाही..? सामाजिक कार्यकर्त्यांना च का प्रत्येक वेळी विषय उचलावा लागतो..? मग नंतर सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास का होतो..? वॉचमन नव्हता का..? नगर परिषद कोणाला पाठीशी घालत आहे ..? की हा एक स्टंट आहे..?

ठोस प्रहार ने यापूर्वी दि 28 मे 2021 रोजी नाट्यगृहातील सुरक्षा ,उघडे तुटलेले दरवाजे या संदर्भात बातमी प्रकाशित देखील केली होती.काही दिवसांपूर्वी येथे उभ्या असलेल्या ट्रॅकटर ची बॅटरी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.या संदर्भातील वृत्त ठोस प्रहारने प्रकाशित केले होते…

Amalner: चोरी के पिछे क्या हैं..? नाट्यगृहातील लाखो रु चे &Quot;सामान&Quot; चोरीला..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button