Jalgaon

सुप्रसिद्ध गायक संघपाल तायडे जळगाव “गौरव पुरस्काराने “सन्मानित

सुप्रसिद्ध गायक संघपाल तायडे जळगाव “गौरव पुरस्काराने “सन्मानित

प्रविन काटे जळगांव

जळगाव : खाकी वर्दीतील गायक संघपाल तायडे हे जळगांव पोलिस दलात कार्यरत आहेत, पोलिस दलात कार्यरत असताना सुधा कर्तव्या सोबत च गायनाची ही कला जोपासत त्यांनी खान्देशाच नाव त्यानी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात गाजवल, त्यांच्या ह्या कार्याची दखल विवीध वृत्त वाहिनी तसेच वृत्त पत्रांनी सुधा घेतली आहे विवीध पुरस्काराने सन्मानित ही त्यांना करण्यात आले आहे आता नुकताच त्यांना जळगांव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रसिद्ध अभिनेते शशांक केतकर,खा, रक्षा खडसे, माजी आ, जगवानी यांच्या हस्ते त्यांना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, पुरस्कार स्वीकारत संघापाल तायडे यांनी मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद वाटतो ह्या पुरस्काराचे खरे मानकरी हे माझे प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम,आणि आपल्या सगळ्यांचे सहकार्य या गोष्टी मला नेहमीच प्रेरित करत असतात मला नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात असे गौरव उदगार त्यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले, कले सोबतच सामाजिक जान ठेवून सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर आहेत, सोबत त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री संघपाल तायडे यांचा देखील मोलाचा वाटा आहे, तसेच संघपाल तायडे हे मूळचे वाकोद जिल्हा जळगांव येथील रहिवासी आहेत, गावकऱ्यांनी दिलेले प्रेम,आणि त्यांच् गवाविशी,असलेले प्रेम हे नेहमीच त्यांना प्रेरित करत असत, तायडे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल गावकऱ्यांनी ही आनंद व्यक्त केला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button