sawada

जामीनावर सुटून आलेल्या गुटका माफियाचा फटाक्यांच्या आतिश बाजीने स्वागत : सावद्यात चर्चेला उधाण?

जामीनावर सुटून आलेल्या गुटका माफियाचा फटाक्यांच्या आतिश बाजीने स्वागत : सावद्यात चर्चेला उधाण?

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे लखन ट्रेडर्स या नावाने प्रसिद्ध दुकानचे मालक सुरेश अमरनानी यांना राज्यात बंदी असलेल्या ३ लाख ६३ हजर ७४९ किमतीचे विमल गुटखासह तंबाखूजन्य पदार्थच्या अवैध साठा सोबत जळगांव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी गेल्या ४ दिवसापूर्वी छापा टाकून सदर दुकानाच्या तळघरातून त्याला गवसले यानंतर सावदा पोलिस ठाण्यात मुद्देमालासह त्यास अटक करण्यात आली‌.याबाबत त्याचा विरुद्ध गुरनं.१७१/२०२१ भादवी कलम ३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र पोलिसांनी सदरच्या अटक संशय आरोपी व अवैध गुटखा तस्कर यास रावेर न्यायालयत हाजर केल्याने त्यास २ दिवसाची पोलीस कोठडी देखील मिळाली होती.

परिणामी दि.१३/११/२०२१ रोजी सदरच्या गुटखा माफियाला अखेर मा. न्यायालयाकडून जामीन मिळाला असता त्याच दिवशी रात्री लखन ट्रेडर्स या दुकानासमोर सदर माफिया त्याच्या खाजगी वाहन आले आले असता त्याचे हितचिंतक व सदर व्यवसायाशी निगडित असलेले व्यापारी वर्ग आणि घरातील तरुणानी फटाक्याच्या जोरदार आतिषबाजीच्या दणक्याने त्या माफियाचे जोरदार व जंगी स्वागत करण्यात आले. जसे की त्यांनी एखादी उत्कृष्ट व समाज उपयोगी काही कार्य करून आले असा आभाव निर्माण करून त्याठिकाणी उपस्थितांच्या गळाभेटी घेऊन आपला आनंद उत्सव साजरा केल्याची शहरात चर्चेला उधाण आल्याचे समजते?

एखाद्या आरोपी राज्यात बंदी असलेल्या विमल गुटखासह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व तस्करी करताना कायद्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर परिणामी जामिनावर घरी सुटून आल्यानंतर त्याचे सदर प्रकारे जंगी स्वागत केले जात असेल तर थेट यामुळे कायद्याला स्वीकार व आदर करणारे असंख्य नागरिकांची हे थट्टा नाही का? सदर घटनेमुळे सर्वसामान्य जनतेत चुकीचा संदेश जाणार नाही का? तरी अशा चुकीच्या प्रथेला जन्म देणाऱ्या व कायद्यास न जुमानणाऱ्या निर्लज्ज लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. अशी अपेक्षा जनमाणसातून व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button