Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये गोल्डन वे टू प्रोग्रेस सॉफ्ट स्किल या विषयावरील वेबीनार संपन्न

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये गोल्डन वे टू प्रोग्रेस सॉफ्ट स्किल या विषयावरील वेबीनार संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये गोल्डन वे टू प्रोग्रेस सॉफ्ट स्किल या विषयावरील वेबीनार संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे कँपस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली. या वेबीनार मध्ये आयआयटी मद्रास द्वारे एनपीटीईएल सुपरस्टार पुरस्काराने सन्मानित असलेले प्राध्यापक श्री. मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.lया वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देणे म्हणजे कोळशाच्या खाणीत सापडणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम असल्याचे सांगताना यशवी विद्यार्थ्यामध्ये सॉफ्ट स्किलचे प्रमाण 85 टक्के आणि टेक्निकल स्किलचे प्रमाण 15 टक्के असल्याचे श्री मोहन देशपांडे यांनी सांगितले.या वेबिनार साठी २०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.साहेबगौडा संगंनगौडर यांनी केले. या वेळी इंजिनीअरींगचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,अकॅडमिक डीन प्रा.तात्यासाहेब जगताप, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.शरद शरद पवार सर्व विभाग प्रमुख, सर्व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट को ऑर्डीनेटर, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button