Maharashtra

Weather: “ह्या” जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट..! येत्या दोन दिवसांत गारपीटची शक्यता..! जळगाव धुळ्याचा समावेश..!

Weather: ह्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट..! येत्या दोन दिवसांत गारपीटची शक्यता..!

नाशिक जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 9 मार्च रोजी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
धुळे आणि साक्री तालुक्यातही अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाची शेती आडवी झाली. हरभरा, मका, ज्वारी, कांदा पुरता उद्ध्वस्त झालंय. पावसामुळे पपई आणि केळीच्या फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत.
अवकाळीमुळे उन्हाळी कांदा, गहू, हरभरा या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहरही गळून गेलाय. मालेगाव, सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button