Maharashtra

Weather:पुढील 3 दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ… “ह्या” जिल्ह्यांना येलो अलर्ट…तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

Weather:पुढील 3 दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ… “ह्या” जिल्ह्यांना येलो अलर्ट…तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा वाढतोच आहे. गेल्या काही दिवसांत वाढणाऱ्या उष्णतेचा नागरिकांना खूप जास्त त्रास होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रात अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे.
पुढचे 3 दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यात पुढील 3 दिवस यलो अलर्ट राहणार आहे.

रविवारी ब्रह्मपुरीत 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांतही तापमानाचा पारा 44 अंशांपुढे होता. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये 40 अंशांपुढे, तर परभणी आणि नांदेड इथं 41 अंशांपुढे तापमानाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ 10 आणि 11 मे या दिवशी तीव्र स्वरूप घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या कालावधीत राज्यात काही भागांत हलक्या पावसाची शक्यता देखील आहे.
दक्षिण कोकणात 10 ते 12 मे दरम्यान, तर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button