Ausa

औसा तालुक्यातील किल्लारी सह 30 खेडी पाणी पुरवठा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने चालू.

औसा तालुक्यातील किल्लारी सह 30 खेडी पाणी पुरवठा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने चालू.
प्रशांत नेटके औसा
औसा : औसा तालुक्यातील किल्लारी सह 30 खेडी पानी पुरवठा योजनेची वीज पुरवठा 2 महिन्या पूर्वी खंडित केला होता 2 दिवसा पूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब किल्लारी येथिल ग्रामीण रुग्णालयात आले असता बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, उपसरपंच युवराज गायकवाड, ग्रामपंचायत सद्स्य विजय भोसले, बाळू महाराज, उप तालुका प्रमुख किशोर भोसले यांनी किल्लारी येथील पाणी प्रश्नाच्या समस्या खासदार साहेब यांना सांगितले खासदार साहेब यांनी तात्काळ महावितरणचे अधीक्षक अभियंता सर्कल ऑफिस लातूर यांना दोन दिवसात वीज जोडणी करा असी सूचना केली अखेर आज महावितरण यांच्या कडून वीज जोडणी करण्यात आली.
यामुळे किल्लारी सह 30 खेडी योजनेतील सर्व ग्रामपंचायत व नागरीक यांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी साहेब यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button