sawada

सावदा न.पा. हद्दीत समाविष्ट भागातील पाणीपट्टी नियमा प्रमाणे आकारण्यात यावी – नगरसेविका नंदाताई लोखंडे

सावदा न.पा. हद्दीत समाविष्ट भागातील पाणीपट्टी नियमा प्रमाणे आकारण्यात यावी – नगरसेविका नंदाताई लोखंडे

“गेल्या दोन वर्षांपासून न.पा. हद्दीत समाविष्ट भागातील रहिवासी नागरिकांना हद्दी बाहेरील प्रमाणे जास्तीची आकारणी केलेल्या पाणीपट्टी दर कमी करा असा जनहिताचा मुद्दा ३ दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका नंदाताई लोखंडे यांनी उपस्थित केला असता या दरम्यान इतर विषयांवर चर्चा सत्र सुरू झाल्याने थेट सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या ह्या प्रश्नाकडे मुख्याधिकारी सह नगराध्यक्षाने लक्ष न दिल्याची माहिती दै.साईमतचे वार्ताहरशी बोलतांना त्यांनी दिली आहे.”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पालिका हद्दीत दि.४ नोव्हेंबर २०१९ पासून समाविष्ट झालेल्या नवीन भागातील रहिवासी नागरिकांना अकारण जाणीवपूर्वक हद्दी बाहेरील श्रेणीत ठेवून मनमानीपणे पालिका प्रशासनाने पाणीपट्टीची रक्कम जसतीची आकारुन तेसे बिल पावत्या देण्यात आले.त्यामुळे येथील रहिवासी लोकांचा भ्रमनिरास झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या २ वर्षापासून सावदा शहराची हद्दवाढ झालेली असून यात कृषी उत्पन्न बाजार समिती मागील परिसर,स्वामी समर्थ कॉलनी,सोमेश्वर नगर,निमजाय मातानगर सह गौसिया नगर,मदिना नगर रजा नगर,पनापिर नगर,ताजुशशरीया नगर,बिलालनगर,इत्यादी भाग समाविष्ट झालेले असून याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाला असताना सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक व मनमानीपणे सदरील भागांच्या रहिवासी नागरिकांना हद्दीबाहेरील श्रेणीत दाखवून किंवा कसे.पंरतु बुद्धीपुरूक्रृत वार्षिक २९०० रूपे प्रति नळ पाणीपट्टी आकारून तश्या बिल पावत्या त्यांना अदा केल्या याची देखील घेऊन वार्ड क्रं ३ ची नगरसेविका नंदाताई लोखंडे यांनी दि.२२/१२/२०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सदरील मुद्दा उपस्थित करून प्रशासकीय अधिकारी व नगराध्यक्षा यांचे लक्ष वेधले होते.मात्र सभेत याकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव नागरिकांना विनाकारण जास्तीच्या आकारण्यात आलेले गैरवाजवी दर मुळे आर्थिक भुर्दंड बसू नये.म्हणून जनहिता करिता पुन्हा हा विषय मार्गी लावण्यासाठी सदरील नगरसेविका यांनी दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून सन २०२०-२१ च्या अदा केलेल्या जास्ती रक्कमचे सर्व बिल तात्काळ दुरुस्त करून पालिका हद्दीतील नियमित लागु पाणीपट्टीचे दर प्रमाणे येथील रहिवासी नागरिकांना बिले आकारून देण्यात यावे.अशी रास्त मागणी केली आहे.महणून याकडे सदरील भागांच्या रहिवासी नागरिकांसह शहरवासियांचे देखील लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button