Chalisgaon

ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण कामांचा शुभारंभ.. पोकलॅन्ड मशिनच्या माध्यमातून नालाखोलीकरण, रूदीकरण व पाणलोट उपचार होणार

ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण कामांचा शुभारंभ..
पोकलॅन्ड मशिनच्या माध्यमातून नालाखोलीकरण, रूदीकरण व पाणलोट उपचार होणार

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान अंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण व गुणवंतदादा सोनवणे याचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते व जलमित्र सोमनाथ माळी याचे प्रयत्नातून जलसंधारणाच्या कामांना सुरवात झाली आहे.
गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचे उद्दीष्ट हाती घेऊन गाव शिवारात गेली चार वर्षापासून लोकसहभागातून जलसंसाधनाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मागील तीन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत बारा सीमेंट बाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले आहेत दोन वर्षापुर्वी गावाने पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत सहभागी होऊन तसेच मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितित शिवनेरी फाउंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान राबवत मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे.यावर्षीही मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचे नियोजन झाले असुन याअनुषंघाने दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले असुन या कामाचा शुभारंभ संभाजी चिधा मोरे व त्याची पत्नी या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते झाला.याप्रसंगी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष भिवसन दिगंबर देसले,भाईसाहब देसले,सेवानिवृत्त दत्तात्रय मोरे,पंकज देसले,शिवनेरी फाउंडेशनचे महेन्द्र पाटील व रम्हणे शिवारातील शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button