Faijpur

लोकसहभागातून जलसंधारण काम कौतुकास्पद-आ शिरीष चौधरी…

लोकसहभागातून जलसंधारण काम कौतुकास्पद-आ शिरीष चौधरी…

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर शहरातील धाडी नदी पात्रात जुन्या कोचुर रस्ता,खिरोदा रस्त्यावर असलेल्या फिल्टर प्लांट जवळ व परिसरातील आमोदा रस्त्यावर असलेल्या मोर नदी पत्रात उभ्या आडव्या चर खोलीकरण काम लोकसहभागातून होत आहे त्यामुळे या कामामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे यासाठी परिसरात शेतकरी बांधव एकत्र येऊन लोकसहभागातून एक चांगले काम या ठिकाणी होत आहे यासाठी शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी आ शिरीष चौधरी यांनी सांगितले तर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच परिसरात या लोकसहभागातून होणाऱ्या पाणी अडवा पाणी जिरवा या ही संकल्पना खूप महत्वाकांक्षी असून यासाठी कोरोना परिस्थिती असताना सुध्दा असताना परिसरातील शेतकरी एकत्र येऊन एक चांगला उपक्रम राबवित आहे या कार्याचे त्यांनी कौतुक करत शासनाद्वारे जे काही मदत होईल त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले
मोर नदी पात्रात जे.सी.बी पूजन करून आ.शिरीष चौधरी, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प्रांताधिकारी कैलाश कडलग,जि. प.सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी प.स.सभापती लीलाधर चौधरी, व आमोदा येथिल शेतकरी याचा हस्ते पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित शेतकरी याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी नगरसेवक केतन किरंगे, कलीम खान मन्यार, देवेंद्र बेंडाळे, प्रा.डॉ व्ही.आर पाटील, प्रा.डॉ आर. एल.चौधरी, जलसंधारण सेवा निवृत्त अधिकारी किशोर पाटील, काँग्रेसय शहराध्यक्ष शेख रियाज,युवक शहराध्यक्ष वसीम तडवी, वसीम जनाब,आसिफ मॅकेनिकल,गणेश गुरव,रामाराव मोरे, पिंटू हंसकर सह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button