Chandwad

चांदवड शहरातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास ३ ऑक्टोंबर रोजी आंदोलनाचा इशारा

चांदवड शहरातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास ३ ऑक्टोंबर रोजी आंदोलनाचा इशारा

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड नगरपरिषदेच्या कामकाजात बद्दल करावेत व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष असून शहरातील अनेक प्रलंबित विषय मार्गी लागावे याकरिता सदर निवेदन आज आमदार डॉ. राहुल आहेर,प्रदेश का.नि.स. अशोक काका व्यवहारे,भाजपा. जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल,भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येते तसेच रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले असून मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात यावे त्याचप्रमाणे मंजूर असलेले व निविदा प्रक्रिया पूर्ण झालेले रस्त्यांच्या कामांना तात्काळ सुरवात करण्यात यावी. शहरामध्ये गटारींचे कामे देखील अपूर्ण असून गटारींची स्वच्छता देखील करण्यात येत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंगू , मलेरिया यासारंख्या रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गटारींचे अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असून शहरामध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे.यामध्ये प्रामुख्याने गटारी वेळेवर साफ न करणे, वेळेवर कचरा न भरणे.त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी शौचालय व मुतारी असून सदर ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरत असल्यामुळे सदर ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून स्वच्छता राखावी.शहरामध्ये अतिक्रमणाचा देखील महत्वाचा प्रश्न असून काहीठीकाणी अतिक्रमणे काढण्यात आली असून अजूनही अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कामे चालू असून स्थानिक नागरिक यांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी.शहरात बांधकाम परवानगी बाबत अनेक संभ्रम असून बांधकाम परवानगी च्या फाईल अनेक दिवस कार्यवाही न होता प्रलंबित राहतात पैश्यांची मागणी करण्यात येते तसेच परवानगी साठी लागणा-या कागदपत्रांची माहितीची यादी आपल्या कार्यालयात दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे.शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असल्याचे दिसून येते यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते त्याचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे.शहरात जुन्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा होत असून अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होत असून सुरळीत पाणी पुरवठा होत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.वरच्या गावात खोकड तलावातून पाणी पुरवठा होत असून अशुद्ध पाणी नागरिकांना येत असून यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे.याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.शहरातील अनेक पथदीप बंद अवस्थेत असून ते सुरु करणेबाबत कार्यवाही व्हावी.त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विद्युत तारा लोमकळत असून, विद्युत खांब देखील जीर्ण अवस्थेत झालेले आहे याकडे देखील एम.एस.ई.बी. मार्फत आपण लक्ष देणे गरजेचे आहे.२०१५ पासून शहरातील पूर्ण-अपूर्ण कामांची यादी बनवून प्रलंबित कामांबद्दल आपल्या कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्यात यावा अथवा सदर यादी आम्हाला अवगत करून दिल्यास आमच्यावतीने देखील पाठपुरावा करण्यात येईल.चांदवड शहर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रियेला सुरवात होण्याआधी ज्या वार्डनिहाय मतदार याद्या नकाशे व प्रभाग रचना झालेली आहे ती योग्य नसल्याचे अनेक तक्रारी आपल्याकडे निवेदनाच्या स्वरुपात प्राप्त झाल्या असून प्रभाग रचना यादीनुसार तसेच प्रगनक गटानुसार वार्ड निहाय नकाशे झालेले नाही त्याबाबत पण कार्यवाही होणे गरजेचे आहे.नगरपरिषदे मार्फत घरपट्टी व पाणीपट्टी सक्तीने वसूल केली जात असून कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले असल्याने याबाबत आपण वेळेवर पैसे न देणा-याला दंड देखील आकाराला असून असून सादर दंड रद्द करून मूळ रक्कम आकारावी.अश्या अनेक मुद्यांवर चर्चा करून आज निवेदन देण्यात आले आहे.तसेच यासाठी मागील लोकप्रतिनिधी यांनी विविध विकास कामांसाठी भरघोस असा निधी आणलेला असून देखील हे प्रशासन वेळोवेळी काम करत नाही व जनतेची दाखल घेत नाही त्यासाठी आज निवेदन देऊन यावर कारवाई न झाल्यास येत्या ३ ऑक्टोंबर रोजी चांदवड नगरपरिषद येथे शहर भाजपा च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.या वेळी मोहन शर्मा,अंकुर कासलीवाल, सुशील पलोड, कासीफ खान,बाळा पाडवी, योगेश बोरसे, सुनील डुंगरवाल, मुन्ना गांधी, सचिन राऊत,प्रशांत वैद्य, महेंद्र कर्डिले,किशोर क्षत्रिय, सचिन राऊत, निलेश काळे, संजय क्षत्रिय, महेश खंदारे,राजाभाऊ आहिरे, मनोज बांगरे, बाळासाहेब वाघ, देवा पाटील, शिवाजी गवळी, गणेश पारवे, राजाभाऊ अहिरे, वर्धमान पांडे, हिरामण शेळके, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button