Shirol

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील पोटनिवडणूकीत चुरशीच्या  मतदानात प्राजक्ता प्रफुल पाटील या 32 मतांनी विजयी

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील पोटनिवडणूकीत चुरशीच्या मतदानात प्राजक्ता प्रफुल पाटील या 32 मतांनी विजयी

शिरोळ(प्रतिनिधी)

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील पोटनिवडणूकीत चुरशीने झालेल्या मतदानात प्राजक्ता प्रफुल पाटील या 32 मतांनी निवडून आल्या त्यांना एकूण 911 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता शांतिनाथ भबिरे यांना 879 मते मिळाली तर नोटाला 18 मते मिळाली. प्राजक्ता पाटील यांच्या विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील पोटनिवडणूकीत चुरशीच्या  मतदानात प्राजक्ता प्रफुल पाटील या 32 मतांनी विजयी

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका सभागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकूण तीन मतदान केंद्रे होती प्रत्येक केंद्राला एक मतमोजणीची0 फेरी याप्रमाणे एकूण तीन मतमोजणीच्या फेऱ्या करण्यात आल्या. पहिल्या फेरीत एकूण 598 मते होती त्यामध्ये 350 मते प्राजक्ता पाटील यांना मिळाली तर अनिता भबिरे यांना 242 मते मिळाली ,दुसऱ्या फेरीत 595 मते होती त्यापैकी 351 मते अनिता भबिरे यांना मिळाली तर 240 मते प्राजक्ता पाटील यांना मिळाली दुसऱ्या फेरी अखेर भबिरे यांनी तीन मतांची आघाडी घेतली होती.तिसरी फेरी निर्णायक ठरली यामध्ये प्राजक्ता पाटील यांना 321 मते तर भबिरे यांना 286 मते मिळाल्याने प्राजक्ता पाटील या 32 मतांनी निवडून आल्याची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी घोषित केले.

विजयानंतर प्राजक्ता पाटील यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी पत्रकारांशी बोलताना प्राजक्ता पाटील यांनी सर्व सामान्य मतदारांचा हा विजय असून या पुढे मी प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले .

Leave a Reply

Back to top button