Nashik

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल ,उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जागृती दिन साजरा

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल ,उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जागृती दिन साजरा

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडो री
जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जागृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे होते.
प्राचार्य आर सी वडजे यांनी मतदार दिनाची माहिती सांगताना सांगितले की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून निर्भय आणि स्वच्छ वातावरणात निवडणुका घेण्यासाठी 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार भारतातील निवडणुका निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी या आयोगावर देण्यात आली. परंतु भारतीय नागरिकांची मतदान करण्याची उदासीनता अलिकडे दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान जनजागृती करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे असे आव्हाहन वडजे यांनी केले.
यावेळी उपमुख्याध्यापक यु डी भरसठ, पर्यवेक्षक श्रीम एन पी बागुल, डॉ जी व्ही आंभोरे, आर व्ही मोकळ आदी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांना यावेळी मतदान प्रतिज्ञा उपशिक्षक संतोष कथार यांनी दिली.
यावेळी २५ जानेवारी मतदार दिन याबाबत सरविस्तर माहिती उपशिक्षिका श्रीम एस डी शिंदे यांनी सांगितली. श्रीम शिंदे व्ही बी यांनी मतदार जनजागृतीचे स्लोगन विद्यार्थ्यांनकडून वधवून घेतले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button