Aurangabad

श्री शशांकसिंह राजपूत यांची स्वर्गीय आकाश राजपूत यांच्या निवासस्थानी भेट

श्री शशांकसिंह राजपूत यांची स्वर्गीय आकाश राजपूत यांच्या निवासस्थानी भेट

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील न्यू हनुमान नगर येथील २० वर्षीय युवक आकाश राजपूत याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. शशांकसिंह राजपूत यांनी स्वर्गीय आकाश राजपूत यांच्या औरंगाबाद शहरातील न्यू हनुमान नगर येथील निवासस्थानी स्वेच्छा भेट दिली. यावेळी सर्व पदाधिकार्यांनी स्वर्गीय आकाश राजपूत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेळी त्यांच्या सोबत श्री. राष्ट्रीय राजपूत करनी सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी रामसिंह मामा, मराठवाडा अध्यक्ष विजयसिंग महेर, मराठवाडा युवा अध्यक्ष विनोद डोभाळ, शहर अध्यक्ष सचिन राजपूत व करनी सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामसिंह मामा यांनी स्वर्गीय आकाश राजपूत यांच्या फोटोला श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच स्वर्गीय आकाश राजपूत यांच्या कुटुंबीयांना धीर देत सांत्वन केले. रामसिंह मामा यांनी सांगितले की ह्या दु:खात संपूर्ण श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना आपल्या सोबत आहे. सर्वात प्रथम ह्या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे मा. श्री. कंवरसिंग बैनाडे दादा यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button