Amalner

Amalner: मंगळग्रह मंदिराला शंकराचार्यांची भेट

मंगळग्रह मंदिराला शंकराचार्यांची भेट

अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराला संकेश्र्वर पिठाधिश्र्वर श्रीमद जगतगुरु शंकराचार्य महाराजांनी भेट दिली. मंदिरातील एकूणच सर्व पूजा विधी तसेच मंदिराच्या माध्यमातून सुरू असलेले लोकाभिमुख तथा जनकल्याणकारी उपक्रमांची त्यांनी माहिती जाणून घेतली. समस्त विश्वस्त मंडळ व पुरोहितांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांच्या शंकांचे निरसन केले. अनेक विद्वान व घनपाठी पुरोहितांच्या मंत्रघोषांच्या साक्षीने शंकराचार्यांचे पाद्यपूजन मंदिराचे खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी सपत्नीक केले.मंदिराचे आध्यत्मिक व निसर्गरम्य वातावरण तसेच देवस्थानाची अल्पावधीत केलेली प्रगती पाहून शंकराचार्यानी प्रसन्नता व्यक्त करत स्वतःच्या गळ्यातील माळ मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या गळ्यात टाकून त्यांचे कौतुक केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील,सचिव एस.बी.बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ दिलीप बहिरम, अनिल अहिरराव, जयश्री साबे आनंद महाले, डी. ए.सोनवणे व सेवेकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button