Dhule

कोडीद उपकेंद्र येथे कोविड लसीकरण स्थळी श्री.राहुल रंधे ह्यांची भेट.

कोडीद उपकेंद्र येथे कोविड लसीकरण स्थळी श्री.राहुल रंधे ह्यांची भेट.
राहुल साळुंके धुळे
धुळे : कोविड-19 चा वाढताप्रादुर्भाव कमी व्हावा ह्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार उपकेंद्र कोडीद येथे मागील महिन्यातील ६ एप्रिल पासून कोवीड_19चे लसीकरण सुरू झाले आहे.
प्रत्येक घरातील गावातील, ४५वर्षे वयोगटावरील नागरिकांना माहिती पोहचविण्याचे करावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये, आपल्याला घरातील व्यक्ती महत्वाचे आहे.
लस घेतल्याने कोरोना झाल्यावर तुम्हाला लक्षणांची तीव्रता कमी राहील किंवा आरोग्याची जोखीम कमी होईल, लस घेतल्यावर आपल्याला कोरोना होण्याचे प्रमाण अत्यल्प व लक्षणाची तीव्रता कमीच असते हॉस्पिटलची गरज पडत नाही. मास्क-सुरक्षित अंतर-स्वच्छता हि त्रिसूत्री तुम्हाला कोरोना होऊ नये यासाठी संरक्षण पुरवेल.
जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण आणि जोडीला मास्क-सुरक्षित अंतर-स्वच्छता या दोन्ही बाबी आपल्याला कोरोना पासून जास्तीत जास्त संरक्षण देतील १ तारखेपासून १८ वर्षे वयोगटापुढील प्रत्येकाने लसीकरण घ्यावयाची सुरू झाले आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण जरूर करावे.
आपण जिंकुच.!कोरोना हरेल.!!
असे आवाहन श्री.राहुल रंधे ह्यांनी केले.
विनीत
तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग शिरपूर.
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी.
समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र कोडीद.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button