Ahamdanagar

वडुलेखुर्द येथे विरभद्रबिरोबा होईक महोत्सव संपन्न

वडुलेखुर्द येथे विरभद्रबिरोबा होईक महोत्सव संपन्न

(सुनिल नजन अहमदनगर) शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील वडुलेखुर्द येथील तूतारे वस्तीवरील विरभद्रबिरोबा मंदिरात होईक महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. विरभद्रबिरोबा देवाला गंगेच्या पाण्याने जलाभिषेक, गावातुन देवाच्या पालखीची छबिना मिरवणूक, डफाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने ओव्या गायन व न्रुत्य,(होईक) आगामी काळातील भविष्यवाणी नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील भक्त एकनाथराव खाटेकर यांनी होईकात आगामी वर्षाची जी भविष्य वाणी केली ती पुढील प्रमाणे ः दिवाळीच्या काळात थोडाफार पाउस येईल. थंडीची लाट येईल. आणि पत्थ्य पाळल्यास कोरोणाची लाट जाईल. बाजरी दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकेल. गहू हरबरे जोडीने पिकतील.गल्ली ते दिल्ली राजकारणाचा धुमाकूळ होईल, मायेच लेकरू पारख होईल, दादागीरी वाढेल, नवीन लोखंडाचे भाव वाढतील, कपाशिचे भाव उच्चांक गाठतील,कांदा पिक काहींना हसवेल तर काहीना रडवेल,पुढील वर्षी जठुड साधेल, काही ठिकाणी पेरणी होईल तर काही ठिकाणी पेरणी होणार नाही. अशी भविष्य वाणी वर्तविण्यात आली. या कार्यक्रमासाठी वंचित आघाडीचे राज्य संपर्क प्रमुख किसनराव चव्हाण सर,अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यां सौ. हर्षदा ताई काकडे, माळेगाव ने च्या शिवशक्ती मिल्क प्राँडक्टचे संचालक जगन्नाथ पाटील गावडे,उमेश भालसिंग, अँडव्होकेट सदाशिवराव अरगडे,मीरीच्या बिरोबा देवस्थानचे भक्त सिताराम भगत,आसाराम भगत, बनसोडे भगत,आभू वीर,महादेव तुतारे,बापू तुतारे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button