व्हायरल कट्टा..कॅटरिना आणि विक्की कौशल कौशल लवकरच विवाह बंधनात…!बॉलिवूडची ‘बार्बी डॉल’ अशी ओळख असलेली की कॅटरिना कैफ ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते.सलमान खान सोबत तिचे नाव गेल्या अनेक वर्षांपासून जोडले जात आहे. पण सलमान मात्र अजूनही कोणत्याही निर्णयावर पोहचू शकत नाही त्यामुळे कदाचित कॅटरिना आता नव्या जोडीदारासोबत दिसत आहे. नुकत्याच कॅटरिना कैफला तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात कॉस्च्युम डिझायनर आणि सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलो याने देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डिझायनरने ‘भारत’ या चित्रपटाच्या सेटवरील कॅटरिनाचा एक जुना फोटो इंस्टाग्राम शेअर केला. यात ती ऑनस्क्रीन लग्नाच्या पांढऱ्या गाऊनमध्ये दिसत आहे. यावर त्याने असे म्हटले आहे की, त्याला आशा आहे की, रील लाईफ वेडिंग सिक्वेंस लवकरच रियॅलिटीमध्ये बदलेल.हे वाचून कॅटरिनाचे चाहते उत्साहित झाले आहेत. ते असा अंदाज लावत आहे की, कॅटरिना आणि विक्की कौशल यांच्या लग्नाचे हे संकेत असावेत. कॅटरिना आणि विक्कीच्या रिलेशनबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत, परंतु त्या दोघांनी या बाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही. त्याने इंस्टा स्टोरीला लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थ डे कॅटरिना कैफ, लवकरच हे सत्यात देखील उतरू शकते.काही दिवसांपूर्वी विक्कीला कॅटरिनाच्या अपार्टमेंटच्या बाहेर बघितले गेले होते.कॅटरिना आणि विक्की कौशल हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत दिसत आहेत.परंतु त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण डिझायनरने केलेल्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सगळेजण आता त्यांच्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीची वाट बघत आहेत.