Amalner

जानवे येथील जीर्ण शाळेला लावले ग्रामस्थांनी लावले कुलूप..!

जानवे येथील जीर्ण शाळेला लावले ग्रामस्थांनी लावले कुलूप..!

अमळनेर जानवे येथिल सुभाष भिला पाटील यांनी 2013 मध्ये जानवे येथील शाळा जीर्ण झाल्याची तक्रार दाखल केली होती.परंतु शाळेने यावर कोणतीही कारवाई न केल्याने जानवे येथील कमेटी, ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी के आर देसले यांनी शाळेला कुलूप लावले आहे.

सदरील खोल्या ह्या जीर्ण झालेल्या होत्या.विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. वारंवार सूचना व तक्रार करून देखील मुख्याध्यापक व शाळेच्या संस्थाचालक यांनी मनमानी केली.व शालेत वर्ग भरविण्यात येत होते.परंतु तक्रारदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही इमारत जीर्ण झाल्याचा दाखला मिळविला आणि जानवे ग्रामपंचायत ला निवेदन दिले या अनुषंगाने आज ह्या शाळेच्या खोल्याना कुलूप लावण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button